Child Vitamin Deficiency: मुलांच्या चेहऱ्यावरील ५ गंभीर लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकते या व्हिटॅमिन्सची कमी

Vitamin Deficiency: लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारी कोरडी त्वचा, रॅशेस किंवा ओठ फुटणे ही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Child Vitamin Deficiency
Children’s facial and skin changes can indicate vitamin and nutrient deficienciesgoogle
Published On

बऱ्याचदा धावपळीमुळे मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण मुलांच्या त्वचेवर दिसणारे काही सूक्ष्म बदल त्यांच्या शरीरातील पोषणाच्या कमतरतेचे संकेत देत असतात. मानवी शरीरातला सर्वात मोठा अवयव असलेली त्वचा ही फक्त बाहेरचे सौंदर्य दाखवत नाही, तर ती शरीराच्या आतल्या आरोग्याचंही प्रतिबिंब असते. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

मुलांची त्वचा जर खूप कोरडी किंवा फाटलेली दिसत असेल, तर ते व्हिटॅमिन A किंवा हेल्दी फॅट्सच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. तसेच त्वचेवर सतत लाल चट्टे, रॅशेस किंवा खाज येत असेल तर व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्सची कमतरता असण्याची शक्यता असते. काही मुलांच्या ओठांवर वारंवार चिरा पडतात किंवा तोंडाच्या कोपऱ्यांवर फट दिसतात, जे व्हिटॅमिन B2 च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.

Child Vitamin Deficiency
Jio Recharge: खुशखबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; सोबत अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा, वाचा किंमत..

जर मुलांची त्वचा अचानक पिवळी किंवा फिकी दिसत असेल, तर ते आयर्नच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाचं लक्षणं असू शकतं. लहान जखमा लवकर भरत नसतील तर व्हिटॅमिन C ची कमतरता असण्याची शक्यता असते. ही सर्व लक्षणं मुलांच्या शरीरात आवश्यक पोषक घटकांची कमतरता दर्शवतात.

पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, दूध, डाळी आणि सुकामेवा यांचा समावेश असावा. जंक फूड आणि पॅकेज्ड पदार्थ टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांना रोज थोडा वेळ उन्हात खेळू देणं आणि शारीरिक हालचाली वाढवणंही गरजेचं आहे. जर गरज वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार देणं योग्य ठरेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Child Vitamin Deficiency
Hair Care Remedies: आठवड्याभरात उगवतील नवे केस, रोज वापरा हे चमत्कारी तेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com