Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केस गळणं, कोरडे होणं आणि कमकुवत केसांची समस्या वाढत चालली आहे. पण काही नैसर्गिक तेलांचा योग्य वापर केल्याने केसांची वाढ लवकरात लवकर होते आणि केस मजबूत राहतात.
आर्गन ऑइलला लिक्विड गोल्ड म्हणतात. हे तेल हलकं असतं, याने कोरडे आणि गुंतलेले केस मऊ आणि चमकदार होतात.
जोजोबा ऑइल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून खोलवर पोषण देतं आणि कोरडेपणा कमी करतं.
मनकेटी ऑइलमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. याने केस तुटणं कमी होतं आणि केसांची ताकद वाढते.
एरंडेल तेल स्कॅल्पमधले रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे केसांची वाढ लवकरात लवकर होते.
नारळाचे तेल केसांसाठी रामबाण उपाय आहे. मात्र कुरळ्या केसांवर जास्त वापरु नका. कारण केस जास्त कडक होऊ शकतात.
ऑलिव्ह ऑइल केसांना नैसर्गिक चमक देते आणि त्यांना हेल्दी बनवतं.
बदामाचे तेल केसांना पोषण देऊन केस गळण्याची समस्या कमी करण्यास मदत करतं.
नैसर्गिक तेलांचा योग्य आणि नियमित वापर केल्याने केसांची वाढ, मजबुती आणि चमक वाढवता येते. पण तुम्हाला जर याचा दुष्परिणाम जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.