Sakshi Sunil Jadhav
तुम्ही जर गरमीमध्ये घरात राहून कंटाळला असाल आणि गावाकडे म्हणजे नागपूरच्या दिशेने जात असाल थांबा.
पुढील माहितीत आपण नागपूरजवळची सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे जाणून घेणार आहोत.
नागपूर म्हंटलं की, तिकडचं सगळ्यात लोकप्रिय ठिकाण म्हणजे अंबाझरी तलाव आहे. तिथे तुम्हाला हिरवाई, बोटिंग आणि संध्याकाळी थंड वारा जाणवेल.
शहराच्या मध्यभागी असलेलं शांत ठिकाण म्हणजे सेमिनरी हिल्स. सकाळी वॉक आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या सुंदर ठिकाणाला एकदा नक्कीच भेट द्या.
नागपूरपासून थोड्या अंतरावर असलेलं हे ठिकाण बोटिंग आणि पिकनिकसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे खिंडसी तलाव. मुलांसोबत फिरायला इथे नक्कीच मजा येईल.
इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहण्यासाठी रामटेक किल्ला नक्की पाहा. टेकडीवरून दिसणारा नजारा तुमचं मन मोहून टाकेल.
नागपूरचं मध्यबिंदू असलेलं झिरो माइल स्टोन हे ठिकाण पर्यटनासाठी बेस्ट स्पॉट आहे. इथे अनेकलोक भेटायला येत असतात.
वन्यजीव आणि जंगल सफारीसाठी तुम्ही नवेगाव नॅशनल पार्कला भेट द्य. उन्हाळ्यातही तुम्हाला इथे थंडावा जाणवेल.
वाघ पाहण्यासाठी सगळेच पर्यटक या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देतात. ईथे तुम्हाला वेगळाच अनुभव घ्यायला मिळेल.