Sakshi Sunil Jadhav
गुरु आचार्य चाणक्य हे आजही आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतात. त्यांच्या मते यश एका दिवसात मिळत नाही, तर रोजच्या छोट्या सवयींमुळे जीवन घडतं.
जर तुम्हाला स्वतःला सुधारायचं असेल, तर या सवयी रोजच्या आयुष्यात अंगीकारणं गरजेचं आहे. असं चाणक्य नितीत म्हंटलं आहे.
रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. याने तुम्हाला कामाला जास्त वेळ मिळेल आणि सुरुवात सकारात्मकतेने होईल.
सकाळच्या शांत वेळेत प्लॅनिंग केल्याने काम जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. शिवाय ते पूर्णही होतं.
रोजच्या रोज काहीतरी नवीन वाचण्याची सवय ठेवा. ज्ञान वाढवणं हे यशाचं सगळ्यात मोठं गुपित आहे.
पुस्तकं, बातम्या किंवा Motivational Quotes रोज वाचा. याने तुमची विचार करण्याची क्षमता वाढते.
तुम्ही सगळ्यात आधी रागावर नियंत्रण ठेवायला शिका. कारण बऱ्याचदा रागात घेतलेले निर्णय चुकतात.
कोणत्याही परिस्थितीत शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा. याने विश्वास आणि यश दोन्ही मिळतं.
दिवसाच्या शेवटी स्वतःचं आत्मपरीक्षण (Self-analysis) करा. याने तुम्हाला चुका ओळखून त्यावर काम करता येतं.