Sakshi Sunil Jadhav
एखादी व्यक्ती खूपच उद्धट असेल आणि तुमचा वेळोवेळी अपमान करत असेल तर त्याचा राग मनात कायमचा राहतो.
तुम्ही अशावेळेस शांत राहून विषय संपवण्याचा विचार करता, पण विज्ञानाने महत्वाची माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला चांगला धडा शिकवता, यात तुमच्या मनात दोष नसतो पण थोडीशी बदल्याची भावना असते.
तुम्ही एकदा याचा बदला घेतला की तुम्हाला शांत वाटतं. मन समाधानी राहतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ताण कमी होतो.
एखाद्या उद्धट व्यक्तीला जेव्हा तुम्ही जागीच उत्तर देता तेव्हा तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो. पण यात तुमच्या बोलण्यात महत्वाचे मुद्दे आणि मर्यादा असावी.
तुम्हाला एकदा ही कला किंवा पद्धत शिकता आली की तुम्ही भविष्यातल्या अशा स्वभावाच्या, वर्तनाच्या व्यक्तींच्या लोकांना सहज सामोरं जावून ताण कमी करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.