
बुधवार,२ एप्रिल २०२५,चैत्र शुक्लपक्ष.
तिथी-पंचमी २३|५०
रास-वृषभ
नक्षत्र- कृत्तिका
योग-आयुष्मान
करण- बवकरण
दिनविशेष- ९ नं. चांगला
मेष - मोठ्या महत्त्वाकांक्षा घेऊन आलेला दिवस आहे. अनेक गोष्टी पदाक्रांत करायला लागतील. पण दिवसाच्या शेवटी काही न हाती आल्यामुळे निराशा पदरी पडेल.
वृषभ - कलासत्ता आणि कलंदर असणारी आपली रास आहे. वेगळा निश्चय घेऊन दिवसाची सुरुवात होईल. दिवस आनंदी जगण्याचा फंडा आज हाती सापडल्यासारखे वाटेल. इतरांवर आपला प्रभाव राहील.
मिथुन - कुटुंबीयांबरोबर काही अडचणी असतील, संवादात त्रुटी असतील तर आज सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. आपण इतरांना बरोबर घेऊन जाण्याचा आजचा दिवस आहे. आर्थिक आवकजावक चांगली राहील.
कर्क - मनाने प्रेमळ कोमल आणि वात्सल्यपूर्ण असणारी आपली रास आहे. आपल्याला भावंडांवर विशेष प्रेम वाढेल. एकत्रितरित्या प्रवासाचे योग आहेत. दिवस चांगला आहे.
सिंह - शेती- बागायतीच्या कामात जोरदार सुरुवात होणार आहे. सुखाची चाहूल लागेल. मातृ सौख्याच्या दृष्टीने दिवस छान आहे.
कन्या - विष्णू उपासना आज फलदायी ठरेल. संततीबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. त्यांच्याकडून सुवार्ता मिळतील. धन गुंतवणूक योग्य ठरेल.
तूळ- तब्येतीच्या जरा कुरबुरी राहतील. पण नोकरी व्यवसायामध्ये सुखकर दिवस आहे. कनिष्ठ यांच्याकडून सहकार्य मिळेल. मात्र मौल्यवान ऐवज आणि जिन्नस आज सांभाळा.
वृश्चिक - छोट्याश्या गोष्टीवरून जोडीदाराशी अबोला निर्माण होईल. पण मिळालेला वेळ कामाच्या ठिकाणी सत्कारणी लावा. व्यवसायात जोडीदाराबरोबर प्रगतीचे योग आहेत.
धनु - महत्त्वाचे निर्णय घेताना थोडेसे बुजरेपण जाणवेल. म्हणून आजचे निर्णय उद्यावर ढकलाल. सहज कामाच्या दृष्टीने दुपारनंतर कामे केल्यास फायदेशीर ठरेल.
मकर - शिव उपासना करावी. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. जवळच्या लोकांच्या भेटी होतील. त्यांच्याकडून लाभ होईल. नातवंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
कुंभ - राजकारण आणि समाजकारणामध्ये यश मिळेल. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आज विशेष उर्मी निर्माण होईल. त्यासाठी सहकार्यांना बरोबर घेऊन कामे कराल.
मीन - मैत्री सुखाचा दिवस आहे. जुने मित्र भेटतील. आनंदी दिवस आहे. जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होईल. आयुष्याची नवी सकाळ अनुभवाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.