Surya Gochar 2026: 17 सप्टेंबरला सूर्य करणार राशीबदल; बुधादित्य राजयोगामुळे या 7 राशींचे सुरू होणार अच्छे दिन

Sun Transit 2026: 17 सप्टेंबर 2026 रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मेष, सिंह, धनु, वृश्चिक आणि मकर राशींना करिअर, पैसा आणि भाग्यात लाभ मिळू शकतो.
Surya Gochar 2026
Surya Gochar 2026saam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या राशीबदलाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतो. त्यात सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. तसंच आत्मविश्वास, वडील, मान-सन्मान आणि प्रशासनाची क्षमता यांचा कारक ग्रह म्हणूनही सूर्याची ओळख आहे. 17 सप्टेंबर 2026 रोजी सूर्य सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशीबदलाला कन्या संक्रांती असे म्हटलं जातं. सूर्य साधारण एक महिना कन्या राशीत राहणार असून 17 ऑक्टोबरपर्यंत त्याचा हा प्रभाव कायम राहील.

या काळात कन्या राशीत आधीपासून असलेल्या बुध ग्रहासोबत सूर्याची युती होणार आहे. सूर्य आणि बुधाच्या या संयोगामुळे 'बुधादित्य राजयोग' तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग शुभ मानला जातो. यावेळी काही राशींसाठी हा काळ चांगला असणार आहे.

Surya Gochar 2026
Shukra Gochar 2026: पुष्य नक्षत्रामध्ये शुक्राचं गोचर; 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा गोचर सहाव्या भावात होणार आहे. त्यामुळे विरोधक, शत्रू किंवा कामातील स्पर्धकांवर मात करण्याची संधी मिळू शकते. एखादा कायदेशीर वाद किंवा कोर्ट-कचेरीचे प्रकरण सुरू असेल, तर या काळात त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बराच काळ एखाद्या आजाराचा त्रास सहन करणाऱ्या व्यक्तींना या काळात आराम मिळू शकतो.

सिंह राशी

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. या गोचरात सूर्य तुमच्या दुसऱ्या म्हणजेच धन भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या बोलण्याचा इतरांवर चांगला प्रभाव पडू शकतो. कुटुंबातील सदस्यांकडून चांगले सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारेल आणि पैसे साठवण्यात यश मिळू शकते.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा गोचर दहाव्या म्हणजेच कर्म भावात होणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होणे किंवा मनासारख्या ठिकाणी बदली मिळण्याचेही योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो आणि मोठा आर्थिक नफा मिळण्याचे संकेत आहेत.

Surya Gochar 2026
Guru Gochar: 2 जूनला होणार गुरुचं महागोचर; 152 दिवस या राशींच्या आयुष्यात येणार अडथळे

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर अकराव्या म्हणजेच लाभ भावात होणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बराच काळ रखडलेल्या योजना या काळात मार्गी लागू शकतात. तुमच्या काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या पदावरील व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर नवव्या म्हणजेच भाग्य भावात होणार आहे. त्यामुळे रखडलेली कामं मार्गी लागण्यास सुरुवात होऊ शकते. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक गोष्टी सहज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतात. प्रवासातून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

Surya Gochar 2026
Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com