

शनीने उत्तरभाद्रपदा नक्षत्रातून बुध ग्रहाच्या अधिपत्याखालील रेवती नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनी ९ ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. हा नक्षत्रबदल एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने घडला आहे. शनीने त्रिग्रही योगादरम्यान आपलं नक्षत्र बदललंय.
हिंदू पंचांगानुसार, वृषभ राशीत सूर्य, बुध आणि चंद्र यांचा त्रिग्रही योग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत, शनीचा हा नक्षत्रबदल एका दुर्मिळ योगायोगापेक्षा कमी नाही. ज्योतिषांच्या मते, हा नक्षत्रबदल काही राशींसाठी शुभ असणार आहे.
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. सरकारी कामात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास दृढ राहणार आहे.
करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही वाढतील. कामासंबंधित छोटे प्रवास देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक कामे पूर्ण करणे सोपे होईल.
हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी हळूहळू दिलासा घेऊन येऊ शकतो. काही काळापासून तुमच्या जीवनात त्रास देणाऱ्या समस्या लवकरच संपणार आहेत. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारणार आहे. तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.