Mahadhan Yog: 9 दिवसांनी या राशींच्या आयुष्यात येणार पैसा; शुक्र ग्रह बनवणार अद्भुत राजयोग

Mahadhan Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ९ दिवसांनंतर शुक्र ग्रह अत्यंत शुभ स्थितीत येऊन राजयोग निर्माण करणार आहे. हा योग संपत्ती, भाग्य आणि आर्थिक प्रगतीसाठी विशेष मानला जातो.
Horoscope
HoroscopeSaam Tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दैत्यांचे गुरु शुक्र दर महिन्याला राशी परिवर्तन करतात. शुक्राला धन–वैभव, प्रेम–आकर्षण, भोग–विलास आणि विवाह यांचा कारक मानण्यात येतं. त्यामुळे शुक्राच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो.

वर्ष 2025 च्या शेवटी म्हणजेच 20 डिसेंबरला शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहेत. याठिकाणी आधीच सूर्य आणि मंगळ उपस्थित असल्यामुळे शुक्र आणि मंगळाचा शुभ योग आणि सूर्याबरोबर शुक्रादित्य योग तयार होणार आहे. याशिवाय गुरुची दृष्टि चौथ्या भावावर पडल्यामुळे शुक्रासोबत महाधन राजयोग तयार होईल.

Horoscope
Neech Bhang Rajyog: 12 महिन्यांनी बनणार 'नीचभंग राजयोग'; शुक्रदेव 'या' राशींचं नशीब पालटणार

या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना नव्या वर्षात म्हणजे 2026 मध्ये भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. यावेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

कन्या राशि (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र धनभावाचे स्वामी होऊन चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये मोठा फायदा मिळेल. नवीन किंवा जुनी मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळू शकते. गुरुची दृष्टि चौथ्या भावाला अत्यंत शुभ बनवतेय.

Horoscope
Akshaya Tritiya 2025: 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला बनणार 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार आकस्मिक धनलाभ

तूळ रास

तूळ राशीत शुक्र तिसऱ्या भावात राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकणार आहे. गुरुची दृष्टि संबंध तयार करून बनलेला महाधन राजयोग या राशीच्या लोकांना भाग्याचा पूर्ण साथ देणार आहे. गुरु भाग्यभावात असल्यामुळे नशीब तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला साथ देणार आहे. धनलाभाचे अनेक मार्ग खुले होणार आहेत. पैशांची तंगी किंवा कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे.

Horoscope
Panchagrahi Yog: 100 वर्षांनंतर बनणार पंचग्रही राजयोग; पाच ग्रह ३ राशींना देणार अफाट पैसा, किर्तीही होणार

सिंह राशि (Leo Zodiac)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी महाधन राजयोग अनेक बाबतीत खास ठरणार आहे. तुमच्या अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. नव्या वर्षात आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत खुलतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास ही वेळ अत्यंत लाभदायक ठरेल. नवीन प्रोजेक्ट मिळाल्यामुळे जलद गतीने धनलाभ होईल.

Horoscope
Guru Gochar: 12 वर्षांनी तयार होणार हंस-केंद्र त्रिकोण राजयोग; 3 राशींचं नशीब बदलून मिळणार आनंदाची बातमी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com