Panchagrahi Yog: 100 वर्षांनंतर बनणार पंचग्रही राजयोग; पाच ग्रह ३ राशींना देणार अफाट पैसा, किर्तीही होणार

Five Planet Conjunction In Makar: ज्योतिषशास्त्रानुसार शंभर वर्षांनंतर एक अद्वितीय पंचग्रही राजयोग निर्माण होणार आहे. या योगात पाच ग्रह एकत्र येऊन विशेष स्थिती निर्माण करतील. या दुर्मिळ ग्रहयोगामुळे काही राशींना प्रचंड पैसा, कीर्ती आणि यश मिळणार आहे.
Panchgrahi Yog
Panchgrahi Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून त्रिग्रही आणि पंचग्रही योग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर दिसून येतो. विशेष म्हणजे 100 वर्षांनंतर पंचग्रही योग तयार होणार आहे. हा योग जानेवारी 2026 मध्ये मकर राशीत चंद्र, मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे होणार आहे.

या काळात काही राशींचे दिवस विशेष शुभ ठरणार आहे. आकस्मिक धनलाभ आणि भाग्योदयाचे योग निर्माण होऊ शकतात. या पंचग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या व्यक्तींसाछी पंचग्रही योग अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीतून तुम्ही सहज बाहेर पडू शकणार आहात. या काळात तुमच्या पुढे फक्त यशाचा मार्ग असणार आहे. सूर्य आणि शुक्राच्या प्रभावामुळे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.

Panchgrahi Yog
Mangal Ast: 139 दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ राहणार अस्त; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, अडचणीही वाढणार

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी पंचग्रही योग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीच्या दशम भावात तयार होणार आहे. यावेळी तुमचा मान-सन्मान वाढेल आणि करिअरमध्ये ग्रोथ होणार आहे. व्यापाऱ्यांना नवीन ऑर्डर मिळून चांगला फायदा होणार आहे.

Panchgrahi Yog
Mahalaxmi Rajyog: मंगळ चंद्रासोबत युती करून बनवणार खास योग; 'या' राशींवर पडणार पैशांच पाऊस

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पंचग्रही योग अनुकूल ठरणार आङे. उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. व्यवसायात घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने जाणार आहेत. मोठी व्यवसायिक डील फायनल होऊ शकणार आहे. संतानाशी संबंधित आनंददायी बातमी मिळू शकते.

Panchgrahi Yog
Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com