Shani Budh Yuti 2025: बुध-शनीच्या युतीने 'या' राशींचं चमकणार नशीब; प्रत्येक क्षेत्रात मिळणार लाभ

Budh Shani conjunction benefits : शनि-बुधाच्या युतीमुळे काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. ग्रहांच्या या विशेष संयोगामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि मानसिक शांती मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा होईल.
Shani Budh Yuti
Shani Budh Yutisaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफल देणारा शनि एका विशिष्ट कालावधीनंतर राशी सोबत नक्षत्र बदलतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. कर्म देणारा शनि सध्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात बसला आहे. गुरु नक्षत्रात शनीची उपस्थिती काही राशींच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

३ एप्रिल रोजी बुद्धीचा कर्ता बुध देखील या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गुरु नक्षत्रात दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. दुसरीकडे २९ मार्चपासून बुध आणि गुरु ग्रह मीन राशीत युती होणार आहे. बुध आणि शनीच्या युतीमुळे काही राशीच्या लोकांना फायदा होऊ शकणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनि-बुधाच्या युतीमुळे कोणत्या राशींना भरपूर फायदा होणार आहे ते पाहूयात.

Shani Budh Yuti
१०० वर्षांनंतर होणार सूर्य ग्रहण आणि सूर्य-शनीच्या युतीचा संयोग; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, मान-सन्मान मिळेल

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाची युती खूप फायदेशीर ठरू शकते. अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. कामाच्या निमित्ताने तुम्हाला अनेक लांबच्या प्रवास करावा लागू शकतो. यामुळे खूप फायदे मिळू शकतात. शिक्षणात सुरू असलेला अडथळा आता संपुष्टात येऊ शकतो.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाची युती अनुकूल ठरू शकणार आहे. शनीच्या कृपेने तुम्हाला जीवनात आनंदासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकते. त्यातून तुमचा फायदा होणार आहे.

Shani Budh Yuti
Surya Grahan: 'या' दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींना धनहानीसोबत आरोग्याच्या समस्या उद्भवणार, काळजी घ्या

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाची युती देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. यावेळी तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. कोर्टाच्या कामात दिलासा मिळेल.

Shani Budh Yuti
Surya Grahan: 4 दिवसांनंतर शनीचं गोचर आणि सूर्यग्रहण होणार एकत्र; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब पाटलणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com