Surya Grahan: 'या' दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींना धनहानीसोबत आरोग्याच्या समस्या उद्भवणार, काळजी घ्या

Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs: ज्योतिष्य शास्त्रानुसार, त्याचा परिणाम मानवी जीवनात आणि देश आणि जगात दिसून येऊ शकतो. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण १४ मार्च रोजी होणार आहे आणि वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी होणार आहे.
Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs
Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signssaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार मार्च २०२५ हा महिना खूप खास आहे. या महिन्यात होळीसारखा सण साजरा केला जातोय तर दुसरीकडे, येत्या काही दिवसांत वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार आहे. परंतु हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाहीत. त्यामुळे सुतक काळ वैध राहणार नाही, परंतु ज्योतिष्य शास्त्रानुसार, त्याचा परिणाम मानवी जीवनात आणि देश आणि जगात दिसून येऊ शकतो. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण १४ मार्च रोजी होणार आहे आणि वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी होणार आहे.

सूर्य ग्रहण हे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तारीख म्हणजेच २९ मार्च २०२५ रोजी दुपारी २:२१ ते सायंकाळी ०६:१४ पर्यंत असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील पहिलं सूर्यग्रहण मीन राशी आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होणार आहे. या दिवशी मीन राशीत अनेक मोठे ग्रह असणार आहे. या दिवशी मीन राशीत सूर्य आणि राहू व्यतिरिक्त, शुक्र, बुध आणि चंद्र देखील लग्नाच्या घरात असणार आहे. सूर्यग्रहणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काळजी घ्यावी लागणार आहे ते पाहूयात.

Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs
Shatank Yoga: 12 मार्चपासून बनणार शुक्र-मंगळ बनवणार शतांक योग; 'या' 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

मेष रास

मेष राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आयुष्यात काही मोठे बदल दिसू शकतात. तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असणार आहे. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. प्रवास करताना थोडी काळजी घ्या.

कर्क रास

या राशीच्या लोकांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. एखादा जुना आजार पुन्हा एकदा उद्भवू शकतो. तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. वादात सापडण्याची शक्यता आहे.

Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs
Surya Nakshatra Gochar: ग्रहांचा राजा सूर्य उत्तरा भाद्रपद नक्षत्रात करणार गोचर; 'या' राशींचं चमकणार नशीब, काम सुरळीत होणार

धनु रास

हे सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली तर योग्य ठरेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. तुमचा राग थोडा नियंत्रणात ठेवावा लागणार आहे. पार्टनरशी मोठं भांडणं होऊ शकतं.

Surya Grahan 2025 Effect on Zodiac Signs
Shani Uday: 27 दिवसांनंतर शनीचा उदय; 'या' 3 राशींच्या व्यक्ती नव्या नोकरीसह करणार बंपर कमाई

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com