
कर्म देणारा शनी हा नऊ ग्रहांपैकी सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला 30 वर्षे लागतात. शनि सध्या कुंभ राशीत अस्त स्थितीत आहे. येत्या काळात शनीचा उदय होणार आहे. शनीचा हा उदय काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असणार आहे.
२९ मार्च रोजी शनी आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर ६ एप्रिल रोजी, तो मीन राशीत उदयास येणार आहे. मीन राशीत शनीचा उदय सर्व राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम करणार आहे. शनीच्या उदयामुळे कोणत्या ५ राशींना शुभ लाभ होऊ शकणार आहे ते पाहूयात. ६ एप्रिल रोजी सकाळी ५:०५ वाजता शनीचा मीन राशीत उदय होणार आहे
या राशीत, भगवान शनिदेव सहाव्या घरात उदयास येणार आहेत. यावेळी या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकणार आहेत. या राशीचे लोक बलवान आणि शक्तिशाली असणार आहेत. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. ज्या कामावर बराच काळ काम करत आहात त्यात आता तुम्हाला यश मिळू शकेल.
नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनी अकराव्या घरात उगवणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अचानक पैसा मिळणार आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहणार आहे. तुमच्या कामाचे कौतुकही होणार आहे. व्यवसायातील समस्याही संपणार आहेत. तुम्हाला अपेक्षित लाभ होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.