१०० वर्षांनंतर होणार सूर्य ग्रहण आणि सूर्य-शनीच्या युतीचा संयोग; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, मान-सन्मान मिळेल

Surya Grahan 2025 and Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण आणि सूर्य-शनि युतीचं संयोजन 2025 मध्ये होणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.
Surya Grahan 2025 and Shani Gochar
Surya Grahan 2025 and Shani Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या बदलणाऱ्या स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण आणि सूर्य-शनि युतीचं संयोजन 2025 मध्ये होणार आहे. ज्याचा काही शुभ परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

29 मार्च रोजी शनी स्वतःच्या कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 29 मार्च 2025 रोजी शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे मीन राशीत शनी आणि सूर्याचा संयोगही होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Year 2025 Rajyog: २०२५ मध्ये ३ राजयोग 'या' राशींना करणार मालामाल, मिळवून देणार छप्परफाड पैसा

कुंभ रास

सूर्यग्रहण आणि सूर्य-शनी यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण हा संयोग तुमच्या राशीत धन आणि वाणीच्या बाबतीत होणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकणार आहे. नोकरदार लोकांसाठी ते चांगले सिद्ध होणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Shani Ast: तब्बल ४० दिवस शनी राहणार अस्त; 'या' राशींवर ओढावणार संकटं, प्रत्येक कामात येणार अडथळा

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण आणि सूर्य-शनि यांचा संयोग शुभ ठरू शकणार आहे. उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हे मिश्रण तयार होणार आहे. या काळात तुमचं उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. या काळात व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तसंच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Dhanadhya yoga: शनी-शुक्राच्या युतीने बनला धनाढ्य योग; नावाप्रमाणे 'या' राशींच्या व्यक्तींना मिळवून देणार पैसा

धनु रास

सूर्यग्रहण आणि सूर्य-शनी यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला सुख मिळू शकतं. तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता. अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसलेली कामं लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे. या काळात संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Rahu Nakshatra Gochar: मायावी ग्रह राहू करणार नक्षत्र गोचर; शनीच्या वर्चस्वामुळे 'या' राशींच्या तिजोरीत भरणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com