Baba Vanga : ५०७९ मध्ये खरंच जग संपणार? बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीने उडवली खळबळ

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांच्या नावाने ५०७९ मध्ये जगाचा अंत होईल, अशी भविष्यवाणी व्हायरल आहे. मात्र, या दाव्याला कोणताही ठोस ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
Baba Vanga Predictions
Baba Vanga Predictionsgoogle
Published On

बाबा वेंगा यांच्या नावाने करण्यात आलेल्या भविष्यवाण्या गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या कथित भविष्यवाण्यांच्या यादीमध्ये ५०७९ हे वर्ष जगाच्या अंताशी जोडले जाते. त्यामुळे ही भविष्यवाणी सर्वात भीतीदायक असल्याचा दावा केला जातो. मात्र, या दाव्यामागे ठोस ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुरावा आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

इंटरनेटवर बाबा वेंगा यांच्या नावाने वर्षानुसार भविष्यवाण्यांची एक मोठी टाइमलाइन फिरत आहे. त्यात वेगवेगळ्या वर्षांतील कथित घटनांचा उल्लेख असून शेवटी 5079 मध्ये जगाचा अंत होईल, असे सांगितले जाते. काही ठिकाणी हा अंत एखाद्या मोठ्या ब्रह्मांडीय घटनेमुळे होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Baba Vanga Predictions
Land vs Flat Investment : जमीन की फ्लॅट? तुमचा पैसा कुठे गुंतवला तर होईल जास्त फायदा? खरेदीपूर्वी जाणून घ्या हा फरक

मात्र, 5079 मध्ये जग संपेल, अशी बाबा वेंगा यांनी स्वतः केलेली अधिकृत भविष्यवाणी असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यांनी आपल्या भविष्यवाण्यांचा अधिकृत लिखित संग्रह मागे ठेवला नव्हता. त्यामुळे त्यांच्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या अनेक दाव्यांचा मूळ स्रोत निश्चित करणे कठीण आहे.

Baba Vanga Predictions
Horoscope Janmashtami 2026: जन्माष्टमीला 4 राशींचं नशीब चमकणार! पैसा, करिअर अन् प्रेमात मिळणार मोठं यश

बाबा वेंगांच्या भविष्यवाण्या व्हायरल का होतात?

बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या नावाने अनेक भविष्यवाण्या सोशल मीडिया, पुस्तके आणि विविध वेबसाइट्सवर प्रसिद्ध होत राहिल्या. जगात एखादी मोठी घटना घडली की, त्यांच्या नावाशी संबंधित जुने दावे पुन्हा व्हायरल होतात.

2026 संदर्भातही त्यांच्या नावाने तिसरे महायुद्ध, नैसर्गिक संकटे, AI चा वाढता प्रभाव, आर्थिक अस्थिरता आणि एलियन संपर्क यांसारखे दावे सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, या दाव्यांसाठी प्रमाणित मूळ दस्तऐवज उपलब्ध असल्याचे स्पष्ट पुरावे नाहीत.

5079 मध्ये खरंच जग संपेल का?

याचे उत्तर सध्या नाही, असेच म्हणावे लागेल. 5079 हे जगाच्या अंताचे वर्ष असल्याची कोणतीही विश्वसनीय वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक पुष्टी उपलब्ध नाही. त्यामुळे हा दावा व्हायरल आणि अप्रमाणित भविष्यवाणी म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

डिस्क्लेमर: या लेखातील माहिती बाबा वेंगा यांच्या नावाने सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या कथित भविष्यवाण्यांवर आधारित आहे. 5079 मध्ये जगाचा अंत होईल, या दाव्याची कोणतीही वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक पुष्टी झालेली नाही. तसेच साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com