Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी ठरताय खऱ्या,तिसऱ्या महायुद्धाबाबत काय होतं भाकीत?

Baba Vanga Predictions : अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जातो की बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. या भाकितामागील सत्य जाणून घेऊया.
 Baba Vanga Predictions
Viral posts about Baba Vanga’s World War 3 prediction spark global curiosity and concern.saam tv
Published On
Summary
  • बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीबाबत सोशल मीडियावर चर्चा

  • तिसऱ्या महायुद्धाबाबत ठोस पुरावे नाहीत

  • काही भाकिते खरे ठरल्याचा दावा

इराण आणि अमेरिकेमधील युद्धाचा परिणाम अख्या जगावर परिणाम झाला आहे. युरोपसह आशिया खंडातील अनेक देशांची स्थिती खराब झाली होती. दरम्यान पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण आणि अमेरिकेतील युद्ध थांबलं आहे. या युद्धासंदर्भात बाब वेंगानं आधीच भाकीत केलं होतं. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जातो की, बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाची आणि त्याच्या अंताचीही भविष्यवाणी केली होती.

 Baba Vanga Predictions
Baba Vanga:भविष्यात मोठं आर्थिक संकट येणार; सोने आणि चांदीचं काय होणार? बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने जगभरात खळबळ

बाबा वेंगा यांच्या भविष्यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे, कारण त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी केलेले भाकीत किती अचूक ठरले आहेत आणि त्यातील किती केवळ चर्चा ठरल्या ते जाणून घेऊ. बाबा वेंगा यांना बाल्कनच्या नॉस्ट्राडॅमस म्हटले जाते. त्या एक अंध महिला होत्या.

त्यांनी भविष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकीत केले होते. त्यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबतदेखील भविष्यवाणी केली आहे. जेव्हा नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय घडामोडींविषयीच्या तिच्या भाकितांची सत्यता पटली, तेव्हा लोकांना खात्री पटली की तिला भविष्य दिसू शकते.

 Baba Vanga Predictions
Akshaya Tritya: तीन राशींसाठी अक्षय तृतीया असेल खास; करिअरमधील प्रगतीसह संपत्तीत होईल वाढ

गेल्या काही आठवड्यांत अनेक सोशल मीडिया पोस्ट्स आणि ऑनलाइन चर्चांमध्ये असा दावा करण्यात आला की, बाबा वेंगा यांनी एका मोठ्या जागतिक संघर्षाची भविष्यवाणी केली होती. ते २०२६ यावर्षी टोकेला पोहोचेल. काही दाव्यांमध्ये एका विशिष्ट कालमर्यादेत तिसऱ्या महायुद्धाच्या समाप्त होईल, अशी भविष्यवाणी देखील केली होती.

दरम्यान, असा कोणताही ठोस पुरावा किंवा लिखित भविष्यवाणी नाहीये, जी थेट अशा भविष्यवाणीचा संदर्भ देते. यापैकी बहुतेक दावे त्याच्या अस्पष्ट आणि प्रतीकात्मक विधानांच्या अर्थावर आधारित आहेत. यातील अनेकदा त्यांच्या मूळ संदर्भातून वेगळे करून वापरले जातात. अनेक इतिहासकार आणि विश्लेषकांचा असा दावा आहे की, बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत. त्याचे शब्द एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेल्यामुळे त्यांची पडताळणी करणे कठीण आहे.

 Baba Vanga Predictions
Nakshatra Gochar: मंगळ आणि शुक्राच्या गोचरमुळे बदलणार ४ राशींचे भाग्य; घरात येणार धन-दौलत अन् सूख-समृद्धी

बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाचे भाकीत केले होते?

बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाचे किंवा ते २०२६ मध्ये संपेल याचे भाकीत केले होते, याचा कोणताही ठोस पुरावा नाहीये. जरी काही अर्थाने त्यांनी जागतिक अशांतता किंवा संघर्षाबद्दल सांगितले होते, तरी हे संदर्भ बरेच व्यापक आहेत. त्यात विशिष्ट कालावधीचा उल्लेख नाहीये. तज्ज्ञांच्या मते व्हायरल होणारे अनेक दावे असंबंधित तथ्यांवर आधारित असतात. ते अचूक भाकिते म्हणून पब्लिश केले जातात. यामुळे अनेकदा चुकीच्या माहितीचा प्रसार होत असतो. कोणतीही पडताळणी न करता ते दावे मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी व्हायरल का होतात?

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी व्हायरल होण्याची अनेक कारणे आहेत.

वाढती जागतिक अस्थिरता आणि भू-राजकीय तणाव.

गूढ भविष्यवाण्यांबद्दल लोकांचे आकर्षण.

सोशल मीडियावर अस्पष्ट आणि अर्धवट माहितीचा प्रसार.

या भविष्यवाण्यांमागील सत्य काय आहे?

विद्वान आणि तथ्य-तपासक अशा भविष्यवाण्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असा सांगतात. संदिग्ध भाषेचा अनेक प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो, आणि नंतर वास्तविक जगातील घटनांनुसार त्यात बदल केला जाऊ शकतो. यासह अनेक व्हायरल पोस्टमध्ये संपादित प्रतिमा किंवा बनावट विधानांचा वापर केला जातो. यामुळे सत्य आणि असत्य यांमधील सीमारेषा अधिकच धूसर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com