

बाबा वेंगांची जागतिक आर्थिक संकटाबाबत भविष्यवाणी चर्चेत
महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे चिंता वाढली
सोनं आणि चांदी सुरक्षित गुंतवणूक ठरू शकतात अशी चर्चा
प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या रहस्यमय भविष्यवाण्या आणि असाधारण दृष्टान्तांसाठी त्यांना "बाल्कनचा नोस्ट्राडेमस" म्हणून ओळखले जाते. त्यांच्या हयातीत त्यांनी जगाशी संबंधित अनेक प्रमुख घटनांच्या भविष्यवाण्या आधीच केल्या आहेत. यात जागतिक राजकारण, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक चढउतार यांचादेखील समावेश आहे.
वेळोवेळी त्यांची काही विधाने खरी असल्याचा दावा केला गेला आहे, म्हणूनच आजही लोक त्यांच्या भाकितांना गांभीर्याने घेतले जातात. अलिकडच्या काळात बाबा वेंगाच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यात जागतिक अर्थव्यवस्था आणि संभाव्य आर्थिक संकटाबाबतही त्यांनी भाकित वर्तवले आहे. यामुळे चिंता वाढलीय. जग आर्थिक अस्थिरता, महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेशी झुंजत आहे, त्यामुळ लोकांचं टेन्शन वाढलंय.
बाबा वेंगा यांनी आधीच संकेत भाकित केलं होतं की, जगाला मोठ्या प्रमाणात रोकड पैशांच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या मते, असा काळ येईल जेव्हा कागदी चलनाचे मूल्य कमी होईल. लोकांना रोख रकमेचा तुटवडा भासेल. त्यावेळी सोने, चांदी आणि तांबे ही सर्वात सुरक्षित संपत्ती बनतील.
गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम सुमारे १.८० लाख रुपयांवर पोहोचले आहे, तर चांदीने प्रति किलो ₹४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना भरीव परतावा मिळाल्याने या धातूंचे मूल्य आणखी जास्त वाढले.
तीव्र वाढीनंतर ३० जानेवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात घसरल्या. सलग तीन दिवस किमती घसरत राहिल्या. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी व्हर्च्युअल सोने आणि चांदी विकण्यास सुरुवात केली.
काहींनी ही संधी साधत घसरणीत सोने-चांदीची खरेदी केली. या घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या. एप्रिल डिलिव्हरीसाठी सोने १.५९ लाखांच्या जवळ पोहोचले, तर चांदी देखील स्थिर राहिली.
डॉलर कमकुवत होत चालला आहे आणि जागतिक बाजारातील अस्थिरता पाहता, बाबा वेंगाने भाकीत केलेल्या आर्थिक संकटाची चिन्हे २०२६ च्या आधीच दिसू लागली आहेत असे अनेकांचे मत आहे. हेच कारण आहे की लोक आता बँका, एफडी आणि रोख रकमेपेक्षा सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.