Nakshatra Gochar: मंगळ आणि शुक्राच्या गोचरमुळे बदलणार ४ राशींचे भाग्य; घरात येणार धन-दौलत अन् सूख-समृद्धी

Nakshatra Gochar 2026: मंगळ आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. या ग्रहबदलांमुळे चार राशींना महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
Nakshatra Gochar 2026:
Astrological symbols showing planetary transit bringing luck and prosperity to selected zodiac signs.saamtv
Published On

चार राशीच्या जातकांचे नशीब पाटलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशीसह नक्षत्रदेखील बदलतात. याच क्रमानुसार ६ एप्रिल रोजी दोन प्रमुख ग्रह त्यांची नक्षत्रदेखील बदलणार आहेत. ६ एप्रिल रोजी दोन प्रमुख ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. हे संक्रमण काही राशींच्या लोकांच्या जीवनात अच्छे दिन घेऊन येतील. हे संक्रमण या राशींखाली जन्मलेल्या लोकांसाठी उज्ज्वल भविष्य घेऊन येईल. त्या काळात धन , दौलत संपत्ती, सूख-समृद्धी येईल.

Nakshatra Gochar 2026:
Vastu Shatra: घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरात येते नकारात्मकता; कसा दूर कराल दोष?

तुम्हाला करिअर, व्यवसाय आणि आर्थिक आघाडीवर प्रचंड यश मिळेल. चला जाणून घेऊया की या कोणत्या राशी आहेत. ६ एप्रिल रोजी पहाटे १:०४ वाजता शुक्र भरणी नक्षत्रात प्रवेश करेल. तर त्याच रात्री १०:०४ वाजता मंगळ उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल. या गोचरामुळे चारही राशींच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे.

Nakshatra Gochar 2026:
Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

हे संक्रमण चार राशींसाठी शुभ ठरेल

वृषभ

शुक्र आणि मंगळाचे संक्रमण वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. काहींना जुन्या गुंतवणुकीतून भरीव नफा मिळेल. जे नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. तुम्ही एखादा शुभ कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करू शकता. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते.

सिंह

शुक्र आणि मंगळाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर कोणी व्यवसाय करत असाल तर तुम्ही एक मोठा करार निश्चित करू शकता. तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायातून भरीव नफा मिळेल. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. या काळात यश तुमच्या मागे येईल.

तूळ

या राशींसाठीही हे संक्रमण अधिक लाभकारी ठरणार आहे. तूळ राशीची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्ही एखाद्या कार्यात मोठे यश मिळवाल. अनेकांच्या संपत्तीत वाढ होईल.

धनु

धनु राशीसाठी हे संक्रमण त्यांच्या करिअरमध्ये एक मोठी झेप ठरणार आहे. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढतील, तसेच तुमच्या बँक खात्यातील शिल्लकही वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com