

मालमत्तेत गुंतवणूक करताना जमीन घ्यावी की फ्लॅट, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांसमोर असतो. दोन्ही पर्यायांमधून दीर्घकालीन संपत्ती निर्माण होऊ शकते. मात्र त्यांचे खर्च, जोखीम, परतावा आणि कर्जाच्या अटी वेगळ्या असतात. त्यामुळे निर्णय घेताना आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आणि रोख प्रवाहाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
जमिनीचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे विकसित होत असलेल्या भागात योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात चांगली मुल्यवाढ देऊ शकते. जमिनीवर इमारत नसल्यामुळे सोसायटी शुल्क, लिफ्ट, रंगकाम किंवा इमारतीच्या देखभालीचा नियमित खर्च नसतो.
मात्र जमीन कुठे आहे, मालकी हक्क स्पष्ट आहेत का, कागदपत्रे योग्य आहेत का, जमिनीवर कोणता बोजा आहे का, रस्ता आणि प्रवेशाची सुविधा आहे का, तसेच भविष्यातल्या विकासाच्या योजना काय आहेत, हे तपासणं महत्त्वाचं आहे.
फ्लॅट खरेदी केल्याने घरासोबत जमिनीतला हिस्सा मिळतो. योग्य परिसरातला फ्लॅट भाड्याने देऊन नियमित उत्पन्न मिळवण्याची शक्यता असते. त्यामुळे भाड्याच्या माध्यमातून देखभाल किंवा कर्जाच्या काही खर्चाची भरपाई होऊ शकते.
दुसरीकडे, फ्लॅटसाठी देखभाल शुल्क, दुरुस्ती, मालमत्ता कर आणि रिकामा राहण्याचा कालावधी यांचा खर्चही लक्षात घ्यावा लागतो. परिसर, इमारतीची गुणवत्ता, सुविधा आणि आसपासच्या समान फ्लॅटच्या किमतींची तुलना करून निर्णय घेणं फायदेशीर ठरतं.
नियमित भाडे उत्पन्न हवे असल्यास फ्लॅट उपयोगी ठरू शकतो, तर दीर्घकालीन मूल्यवाढीचा विचार असल्यास योग्य ठिकाणची जमीन आकर्षक पर्याय ठरू शकते. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रे, परिसर, कर्जाचा भार आणि स्वतःची आर्थिक क्षमता यांचा सखोल विचार करणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.