
वैदिक कॅलेंडरनुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असत. नऊ ग्रहांपैकी चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. ते एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. ज्यावेळी चंद्र गुरु ग्रहाशी युती करतो किंवा त्याची दृष्टि त्यावर पडते तेव्हा गजकेसरी नावाचा राजयोग निर्माण होतो.
येत्या काळात म्हणजेच २४ मार्च रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावर वृषभ राशीत असलेल्या गुरूची दृष्टी वाढणार आहे. ज्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींचे नशीब उजळू शकणार आहे. गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना चांगले दिवस जगता येणार ते पाहूयात.
चंद्र २४ मार्च रोजी सकाळी १०:२४ वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्या ठिकाणी तो २६ मार्च रोजी दुपारी ३:१४ वाजेपर्यंत राहणार आहे. अशा परिस्थितीत, गजकेसरी राजयोग २६ मार्चपर्यंत राहणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. लग्नाच्या घरात गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवता येणार आहेत. तुम्ही या काळात प्रचंड यश मिळवू शकता. तुम्ही व्यवसायात भागीदार शोधत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकणार आहे. मुलाच्या लग्नासाठी चांगला प्रस्ताव येऊ शकतो.
या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होऊ शकणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात खूप फायदे मिळू शकतात. नवीन नोकरी सुरू करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नवीन व्यवसाय सुरू करून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. परदेशांशी संबंधित लोकांनाही मोठे फायदे मिळू शकतात.
या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप अनुकूल ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळू शकणार आहे. मुलांशी असलेले वाईट संबंध पुन्हा एकदा चांगले होऊ शकतात. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या तणावाचा सामना करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.