Surya Gochar
Surya Gocharsaam tv

Surya Gochar: एप्रिल महिन्यापासून 'या' 3 राशींना मिळणार धन-संपत्ती; सूर्याच्या गोचरमुळे मिळणार बक्कळ पैसा

Surya Gochar 2025: 14 एप्रिलला सूर्य आपल्या उच्च स्थान मेष राशीत प्रवेश करणार आहे. हा संक्रमण 15 मेपर्यंत सुरू राहणार आहे. सूर्याच्या या परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.
Published on

ग्रहांचा राजा सूर्य हा आत्मा तसंच पित्याचा कारक मानला जातो. सूर्य नियमितपणे त्याच्या राशीमध्ये बदल करतो. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर काही ना काही प्रकारे होत असतो. यावेळी सूर्य मीन राशीत आहे. मात्र पुढच्या म्हणजेच एप्रिल महिन्यात तो गोचर करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, १४ एप्रिल रोजी सूर्य उच्च राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य १५ मे पर्यंत याच राशीत राहणार आहे. सूर्याच्या या भ्रमणाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. परंतु काही राशींसाठी हे गोचर फायदेशीर ठरणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Surya Gochar
Shani Gochar 2025: ३० वर्षांनी शनी करणार गुरुच्या राशीत प्रवेश; शनी देवाच्या कृपेने 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मिथुन रास

मेष राशीतील सूर्याचं गोचर मिथुन राशीसाठी खूप शुभ राहणार आहे. या राशीच्या अकराव्या घरात सूर्य असणार आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधींनी भरलेला असणार आहे. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचं एप्रिल महिन्यातील गोचर फायदेशीर ठरणार आहे. ज्यामुळे करिअर आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात अडकलेल्या कामांना पुन्हा गती मिळू शकणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकतं. जोडीदारासोबतचे संबंध गोड होणार आहेत.

Surya Gochar
Surya-Shani Yuti: 30 वर्षांनंतर शनी-सूर्याची होणार युती; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार, हाती येणार पैसाच पैसा

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे भ्रमण खूप शुभ ठरू शकणार आहे. नोकरी करणाऱ्या आणि व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात आणि नफा वाढू शकतो. यावेळी समाजात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. जीवनात काही मोठे आणि सकारात्मक बदल दिसू शकतात.

Surya Gochar
Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षापासून 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन; धन-संपत्तीत होणार वाढ, 5 दुर्लभ संयोगही होणार तयार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com