Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षापासून 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन; धन-संपत्तीत होणार वाढ, 5 दुर्लभ संयोगही होणार तयार

Hindu New Year 2025 Horoscope : हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला बुधादित्य आणि मालव्य राजयोगाचा निर्माण होणार आहे. अशा स्थितीत हे नवीन संवत काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या विशेष योगामुळे काही राशींच्या लोकांना आर्थिक प्रगती, नोकरीत बढती आणि उत्पन्नवाढीच्या संधी मिळू शकतात.
Gudi Padwa These Zodiac Signs
Gudi Padwa These Zodiac Signssaam tv
Published On

वैदिक कॅलेंडरनुसार, दरवर्षी हिंदू नववर्ष 30 मार्चपासून सुरू होणार आहे. या संवतचा राजा आणि मंत्री सूर्य देव आहेत. यावेळी संवत एका दुर्मिळ योगायोगाने सुरू होणार आहे. या संवतमध्ये सूर्य, चंद्र, शनि, बुध, राहू या पाच ग्रहांची युती होणार आहे.

त्यामुळे हिंदू नववर्षाला बुधादित्य आणि मालव्य राजयोग देखील तयार होणार आहे. अशा परिस्थितीत हे संवत काही राशींसाठी शुभ ठरू शकणार आहे. या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना हा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Gudi Padwa These Zodiac Signs
Chaturgrahi Yog: ५० वर्षांनी बनणार दुर्मिळ चतुर्ग्रही योग! 'या' राशींवर शनी-बुधासह ४ ग्रहांची विशेष कृपा

मकर रास

हिंदू नववर्ष तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना व्यवसायात नफा मिळवण्याच्या संधी मिळू शकणार आहे. शनिदेवाचं गोचर होताच या राशींच्या व्यक्तींना साडेसतीपासून मुक्तता मिळू शकणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष अनुकूल ठरू शकणार आहे. कारण २९ मार्च रोजी शनि ग्रहाचे गोचर होताच तुम्हाला शनीच्या धैय्यापासून आराम मिळू शकणार आहे. तुमचं रखडलेलं महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढू शकतं.

Gudi Padwa These Zodiac Signs
Rajyog : 500 वर्षांनंतर बनले ३ राजयोग; दिवाळीपूर्वी चमकणार 'या' राशींचं नशीब

मिथुन रास

हिंदू नववर्ष तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आता यश मिळू शकणार आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकता. नवीन व्यवसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकणार आहे.

Gudi Padwa These Zodiac Signs
Triple Rajyog : 500 वर्षांनंतर शुक्रादित्य, मालव्यसह बनणार 3 महाराजयोग; 'या' राशींच्या नशीबाचा तारा चमकणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com