Surya Gochar: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशींच्या अडचणीत वाढ; ताण वाढणार, पैशांचं नुकसान होण्याची शक्यता

Sun Transit 2025: सूर्य आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा प्रत्येक व्यक्तींवर त्याचा परिणाम होत असतो. यावेळी काही लोकांना त्रासापासून मुक्ती मिळते, तर काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Surya Gochar
Surya Gocharsaam Tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष स्थान देण्यात आलं आहे. यावेळी ग्रहांचा राजा सूर्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ज्यावेळी सूर्य आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा प्रत्येक व्यक्तींवर त्याचा परिणाम होत असतो. यावेळी काही लोकांना त्रासापासून मुक्ती मिळते, तर काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सूर्यदेव एका महिन्यात राशी आणि महिन्यातून दोन ते तीन वेळा नक्षत्रात बदल करतात. नुकतंच 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी सूर्याने राशी बदलली आहे. त्याने शनीच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश केला असून तो सुमारे महिनाभर उपस्थित राहणार आहे. यावेळी सुर्याच्या राशी बदलाने काही राशींना त्रास होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Surya Gochar
Vipreet Rajyog: 50 वर्षांनंतर बुध ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा, नशीबही चमकणार

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं गोचर आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणार नाही. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळणार नाही. काही दिवस पैशांच्या तुटवड्याला सामोरं जाव लागणार आहे. घरातील एखाद्या सदस्याला ही गंभीर दुखापत होऊ शकते.

Surya Gochar
Chaturgrahi Yog: कुंभ राशीत बनणार चतुर्ग्रही राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ, पैसे मोजून मोजून थकाल

धनु रास

सूर्याची बदललेली हालचाल धनु राशीच्या लोकांना सर्वात जास्त त्रास देणार आहे. ऑफिसमध्ये नोकरदार लोक कामात गडबड करू शकतात. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात.

Surya Gochar
Mangal Margi: 24 फेब्रुवारी रोजी मंगळ चालणार सरळ चाल; 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, मोठ्या नुकसानीची शक्यता

कुंभ रास

कन्या आणि धनुसोबत कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा बदल योग्य ठरणार नाही. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकतं. नात्यात उपस्थित असलेल्या लोकांच्या नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

Surya Gochar
Budh Yam Gochar: बुध आणि यम मिळवून बनवणार अर्धकेंद्र राजयोग; 'या' राशींना मिळणार अडकलेला पैसा, धनसंपत्ती वाढणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com