Gen Alpha Club : "दादरच्या रस्त्यांवरून हॉर्स राइडिंग करत शाळेत जाते", शाळकरी मुलीच्या वाक्याने प्रशासन हादरले

Dadar potholes : मुंबईतील दादरच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘रोज हॉर्स राइडिंग करत शाळेत जाते’ या शाळकरी मुलीच्या वक्तव्याने दादरच्या रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Gen Alpha Club
Gen Alpha ClubSaam TV Marathi
Published On

Next Gen Reporter Dadar Mumbai : मुंबईतील महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर असलेल्या दादरमधील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच गंभीर समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी ‘नेक्स्ट जन रिपोर्टर’ने (Next Gen Reporter) थेट दादरच्या रस्त्यांवर उतरून ग्राउंड रिपोर्टिंग केले आहे.

विद्यार्थिनीचा प्रशासनाला थेट सवाल

या ग्राउंड रिपोर्टिंगदरम्यान एका शाळकरी विद्यार्थिनीने रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अत्यंत अनोख्या आणि उपरोधिक शब्दात प्रशासनाचे लक्ष वेधले. "मी रोज दादरच्या या रस्त्यांवरून हॉर्स राइडिंग करत (घोड्यावर बसून उड्या मारल्यासारखा अनुभव घेत) शाळेत पोहोचते," असे म्हणत तिने रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि महापालिकेच्या कारभारावर जोरदार टोला लगावला.

नागरिक त्रस्त, अपघातांची भीती

दादर हा मुंबईचा मध्यवर्ती भाग असल्याने येथे रोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. मात्र, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीचालक घसरून पडण्याचे आणि गाड्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रोजचे प्रवासी यांना या खड्ड्यांमधून प्रवास करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.

‘नेक्स्ट जन रिपोर्टर’च्या या थेट अहवालामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आतातरी संबंधित पालिका प्रशासन दादरच्या रस्त्यांची डागडुजी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gen Alpha Club
Husband Wife Relationship : पती-पत्नीने एकमेकांचा फोन चेक करावा की नाही? तज्ज्ञांचा मोठा खुलासा; वाचून उडेल झोप

‘नेक्स्ट जन रिपोर्टर’नं काय सांगितलं, शब्द ना शब्द..

"नमस्कार, मी राव्या रोहित थोडे. इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. मला बोलायचंय या रस्त्यांबद्दल... नाही नाही नाही, मला बोलायचंय या खड्ड्यांबद्दल... नाही नाही नाही, मला बोलायचंय या खड्ड्यांमधील रस्त्यांबद्दल!

एक तर हा छोटा रस्ता, त्यात विद्यार्थ्यांची, पालकांची, टू व्हिलर, फोर व्हिलरची रहदारी. पावसाळ्यात खड्ड्यांची आणि रस्त्याची अवस्था खूप बिघडत चाललेली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी अशाच रस्त्यांमुळे माझ्या मम्मीला स्पॉन्डिलायसिस गिफ्ट मिळालेला आहे.

सकाळी शाळेत येताना 'हॉर्स रायडिंग' हमखास होऊन जाते! गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रस्ता असाच आहे.

सांगायचं तात्पर्य इतकंच... आम्हाला अशा रस्त्यांचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षित रस्ता हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो हक्क मिळालाच पाहिजे! गव्हर्नमेंटने केलेल्या इनकम्प्लिट कामांमुळे आता मलाच त्यांचे मॉनिटर बनावे लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी, ही आमची नम्र विनंती. बघा जमतंय का!

आणि हा मास्क बघताय? तो परेल-दादर इथे चाललेल्या प्रचंड कन्स्ट्रक्शनचाच देन आहे! हा जर मी घातला नाही ना, तर मला रोज सर्दी-खोकला होत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com