kamali Marathi Serial : नेहमी दोन वेण्यांवर दिसणाऱ्या 'कमळी'चा नवा लूक, फोटो पाहून चाहते पडले प्रेमात

kamali New Look : 'कमळी' मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. कमळीचा बदललेला लूक पाहून हृषी घायाळ झाला आहे. 'कमळी' चा नवीन प्रोमो पाहा.
kamali New Look
kamali Marathi SerialSAAM TV
Published On
Summary

'कमळी' मालिकेत 'कमळी'चा लूक बदलला आहे.

कमळी आणि हृषीचे नाते नवीन वळण घेणार आहे.

'कमळी'चा नवीन लूक पाहून चाहते खुश झाले आहेत.

अलिकडेच सुरू झालेली लोकप्रिय मालिका 'कमळी' (kamali) प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत कमळी आणि तिच्या मैत्रिणी कबड्डी खेळताना दिसत आहे. मात्र सध्या 'कमळी'च्या नवीन लूकचे सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 'कमळी'च्या नवीन लूकचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

'कमळी' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात 'कमळी' एका खास अंदाजात पाहायला मिळत आहे. 'कमळी'चे बदललेले रूप पाहून हृषी आश्चर्यचकित झाला आहे. कमळीवरून हृषीची नजर हटत नाही आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरात कमळी कार्यक्रमाची तयारी करत आहे. तिने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तसेच मोकळे केस, कानात झुमके आणि कपाळावर टिकली लावून ती खूपच सुंदर दिसत आहे.

घरात सजावट करताना कमळी चिकटपट्टी मागते. तेव्हा तिथे कोण नसते. हृषी तिचा आवाज ऐकून तिला चिकटपट्टी देतो. हृषीला पाहताच कमळीचा तोल जातो. कमळी पडणार तेवढ्यात तिला हृषी सावरतो. हे सर्व लांब उभे राहून नयनतारा पाहते. नयनताराच्या मनात हृषी आणि कमळीच्या नात्याबद्दल शंका निर्माण होते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'कमळी' मालिकेची वेळ

'कमळी' मालिकेत 'कमळी'ची भूमिका मराठी अभिनेत्री विजया बाबर करत आहे. तिचा आधीचा लूक खूपच साधा-सोज्वळ होता. दोन वेणी त्याला लाल रंगाच्या रिबीन बांधलेली असायची.परकर पोलका घालून ती सर्वत्र वावरायची. नवीन 'कमळी' मालिका रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.

kamali New Look
Singer Devi : लोकप्रिय गायिका लग्नाशिवाय झाली आई, दिला गोंडस मुलाला जन्म

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com