Surabhi Jayashree Jagdish
अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन केले जाईल.
विसर्जनापूर्वी बाप्पांची विशेष पूजा केली जाते आणि काही पारंपरिक उपाय केले जातात.
काही भक्त विसर्जनापूर्वी बाप्पाच्या कानात मंत्र सांगतात.
ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
गणपतीच्या कानात हा मंत्र सांगितल्याने बाप्पा भक्तांच्या कामना पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे.
काही लोक विसर्जनापूर्वी बाप्पाच्या कानात आपली मनोकामना देखील सांगतात.
असं मानलं जातं की, यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.