लोकप्रिय गायिका देवी अविवाहित आहे.
गायिकेला आधुनिक वैद्यकीय पद्धतीच्या मदतीने बाळ झाले आहे.
देवी हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
लोकप्रिय गायिका देवी (Singer Devi) हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 'रघुपती राघव राजा राम' या गाण्यामुळे गायिका चांगली वादात सापडली होती. गायिका देवी अविवाहित असून तिने एकटी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाशिवाय गायिका देवी आई झाली आहे.तिने ऋषिकेश येथील एम्स येथे मुलाला जन्म दिला आहे. आधुनिक वैद्यकीय पद्धतींच्या मदतीने गायिका आई झाली.
मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी ऋषिकेशमधील एम्स येथे आधुनिक वैद्यकीय पद्धतींनी बाळाला जन्म दिला. आई आणि मूल दोन्ही पूर्णपणे निरोगी आहेत. जर्मनीमध्ये स्पर्म बँकच्या मदतीने आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान पद्धतीने गर्भधारणा केली असल्याची माहिती समोर आली आहे. देवी आणि तिच्या बाळाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
देवी या बिहारच्या छपरा येथे राहणाऱ्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, तिचा लग्नावर विश्वास नाही. म्हणून तिने अविवाहित राहून आई होण्याचा निर्णय घेतला. देवीने यापूर्वीही आई होण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती यशस्वी झाली नाही. तिला 6 सप्टेंबर रोजी एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आले आणि 9 सप्टेंबरला ऑपरेशनद्वारे मुलाला जन्म दिला.
देवीने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ज्यात 'पिया गेइले कलकटवा ए सजनी', 'कुण का ठंडा पानी', 'परवाल बीच जायब भागलपूर', 'ओ गोरी चोरी-चोरी' 'परदेसिया-परदेसिया', 'पिया बन्सिया बजावे आधी रतीया', 'दिल तुझे पुकारे आजा', 'अंगूरी बज्जी नहीं', 'अंगूरी बज्जू नही' याचा समावेश आहे. देवी हिंदी, मैथिली आणि मगही या भाषांमध्येही गाणी गाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.