सलमान खान नाही तर 'हा' सुपरस्टार करणार Bigg Boss 19 होस्ट,'वीकेंड का वार' मस्तच रंगणार

Salman Khan Not Hosting Weekend Ka Vaar : 'बिग बॉस 19'च्या तिसऱ्या आठवड्यात सलमान खान 'वीकेंड का वार' होस्ट करणार नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याच्या जागी शोमध्ये कोण दिसणार, जाणून घेऊयात.
Salman Khan Not Hosting Weekend Ka Vaar
Bigg Boss 19SAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19' मध्ये होस्ट बदलण्यात आला आहे.

तिसऱ्या आठवड्यात सलमान खान 'वीकेंड का वार' होस्ट करणार नाही.

'वीकेंड का वार' सुपरस्टार अक्षय कुमार होस्ट करणार आहे.

'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) प्रत्येक दिवशी नवीन राडा पाहायला मिळत आहे. घरात प्रत्येक गोष्टीवरून सदस्यांमध्ये भांडण होताना दिसत आहे. तिसऱ्या आठवड्यात 'बिग बॉस 19'च्या घरातून कोण बाहेर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशात आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान (Salman Khan ) तिसऱ्या आठवड्याच्या 'वीकेंड का वार'चे होस्टिंग करणार नाही आहे.

सलमान खानच्या जागी बॉलिवूडचे दोन सुपरस्टार 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री घेऊन 'वीकेंड का वार' गाजवणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरचा 'वीकेंड का वार' अक्षय कुमार (Akshay Kumar ) आणि अरशद वारसी (Arshad Warsi ) होस्ट करणार आहेत. 'जॉली LLB 3' ( Jolly LLB 3) चित्रपटातील कलाकार 'बिग बॉस 19'च्या स्टेजवर कसा धुमाकूळ घालतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे 'बिग बॉस 19'मध्ये या आठवड्यात सलमान खान दिसणार नसल्यामुळे चाहते नाराज आहेत.

बॅटल ऑफ गलवान

सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान'मुळे व्यस्त आहे. चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्ये आहे. त्यामुळे भाईजान 'बिग बॉस 19'मध्ये दिसणार नाही. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जॉली LLB 3

'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अरशद वारसीने (Arshad Warsi) वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025ला रिलीज होणार आहे.'जॉली एलएलबी 3' चे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे. 'जॉली एलएलबी 2' हा चित्रपट 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Salman Khan Not Hosting Weekend Ka Vaar
Varun Tej-Lavanya Tripathi : वरुण तेज-लावण्या त्रिपाठीला पुत्ररत्न, आजोबा चिरंजीवी यांची नातवासाठी खास पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com