Varun Tej-Lavanya Tripathi : वरुण तेज-लावण्या त्रिपाठीला पुत्ररत्न, आजोबा चिरंजीवी यांची नातवासाठी खास पोस्ट

Varun Tej-Lavanya Tripathi Welcome Baby Boy: साऊथ अभिनेता वरुण तेज कोनिडेला बाबा झाला आहे. मेगास्टार चिरंजीवी यांनी बाळाच्या स्वागतासाठी खास पोस्ट केली आहे.
Varun Tej-Lavanya Tripathi Welcome Baby Boy
Varun Tej-Lavanya TripathiSAAM TV
Published On
Summary

साऊथ सुपरस्टार वरुण तेज कोनिडेला आणि लावण्या त्रिपाठी आई-बाबा झाले आहेत.

लावण्या त्रिपाठीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

मेगास्टार चिरंजीवी यांनी बाळाच्या स्वागतासाठी भावुक पोस्ट केली आहे.

साऊथ सुपरस्टार अभिनेता वरुण तेज कोनिडेला (Varun Tej ) आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठी (Lavanya Tripathi) यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या घरी गोंडस पाहुण्याचे स्वागत झाले आहे. लावण्या त्रिपाठीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

वरुण तेज कोनिडेला आणि लावण्या त्रिपाठी आई-बाबा झाले आहेत. त्यांना पहिला मुलगा झाला आहे. त्यामुळे सध्या वरुण तेज कोनिडेला आणि लावण्या त्रिपाठी यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरुण तेज कोनिडेलाने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. पोस्टमध्ये वरुण तेज कोनिडेला, लावण्या त्रिपाठी आणि त्यांचे बाळ दिसत आहे. त्यांनी या पोस्टला खूप खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की, "Our little man"

लावण्या त्रिपाठीने 10 सप्टेंबरला मुलाला जन्म दिला आहे. वरुणचे काका साऊथचे जेष्ठ सुपरस्टार चिरंजीवी हे (chiranjeevi ) आता आजोबा झाले आहेत. त्यांनी देखील बाळाचे सुंदर स्वागत केले आहे. त्यांनी बाळ आणि वरुणसोबत एक छान फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

चिरंजीवी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की,"बाळा तुझे या जगात स्वागत आहे. कोनिडेला कुटुंबातील बाळाचे हार्दिक स्वागत. वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी पालक झाल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. नागाबाबू आणि पद्मजा खूप आनंद झाला आहे. तुम्हाला आजी-आजोबा म्हणून बढती मिळाली आहे. बाळाला आनंद, आरोग्य आणि भरपूर आशीर्वाद मिळोत अशी शुभेच्छा.तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आमच्या मुलाला पाठीशी राहू दे."

वरुण तेज कोनिडेला आणि लावण्या त्रिपाठी यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली आणि 2025 मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. सध्या मनोरंजनसृष्टीतून वरुण तेज कोनिडेला, लावण्या त्रिपाठी आणि चिरंजीवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Varun Tej-Lavanya Tripathi Welcome Baby Boy
Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची भन्नाट लव्ह स्टोरी; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचा टीझर पाहिला का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com