ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात एकूण १५ खेळाडू आहेत. त्यापैकी किती विवाहित आहेत आणि किती अविवाहित आहेत, जाणून घ्या.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह , अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संदीप यज्ञवीर, कुलदीप, संजूवीर, हरिखेत राणा, रिंकू सिंग
आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात अनुभवी खेळाडूंसह नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे.
या आशिया कपसाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे तर शुभमन गिलकडे हा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने २०१६मध्ये देविशा शेट्टी सोबत लग्न केले. तर शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि संजू सॅमसन या खेळाडूंची देखील लग्न झाली आहेत.
कुलदीप यादव आणि रिंकू सिंग यांचा याचा वर्षी साखरपुडा झाला आहे. लवकरच हे खेळाडू लग्नबंधनात अडकतील.
संघातील असे ५ खेळाडू ज्यांचे अजूनही लग्न झालेले नाही. यामध्ये शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अर्शदिप सिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे.