ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोन्याचे दागिने शरीराचे सौंदर्य वाढवते. तसेच धार्मिक दृष्टिकोनातून सोन्याचा संबंध गुरु बृहस्पतीशी आहे. सोनं परिधान करण्यासाठी काही नियमही सांगितले आहेत.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी सोने घालू नये जेणेकरून त्यांची प्रगती कधीही थांबणार नाही.
मकर राशीच्या लोकांसाठी सोने परिधान करणे अशुभ मानले जाते. याचा त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वृषभ राशीच्या लोकांनी सोनं घालणे टाळावे कारण त्यामुळे त्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा स्थायिक होऊ शकते आणि सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते.
जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती वाईट असेल तर सोनं घालण्यापूर्वी तुम्ही विचार करा. यामुळे तुमची प्रगती थांबू शकते.
ज्या लोकांचा मूलांक क्रमांक ०८ आहे त्यांनी चुकूनही सोनं घालू नये. यामुळे मूलांक क्रमांक ०८ असलेल्या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
कुंभ राशीच्या लोकांनीही सोनं घालू नये. यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तसेच आर्थिक संकट देखील येऊ शकते.