Utkarsh Shinde Post : "मराठीचा टेंभा मिरवणारे मराठी माणसाला न्याय मिळवून देणार का?", वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी अभिनेता उत्कर्ष शिंदेचा सवाल

Actor Utkarsh Shinde News : वरळीच्या 'हिट अँड रन' प्रकरणी 'बिग बॉस मराठी' फेम उत्कर्ष शिंदेने भाष्य केले आहे. त्याने इन्स्टा स्टोरी शेअर करत या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे.
Utkarsh Shinde Post
Utkarsh Shinde NewsInstagram

सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 'हिट अँड रन' प्रकरणाची दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर सारख्या महत्वाच्या शहरात हे प्रकरण घडत आहे. नुकतंच ७ जुलै रोजी वरळीमध्ये, 'हिट अँड रन' प्रकरणाची घटना घडली. या घटनेमध्ये, मच्छी आणण्यासाठी बाहेर गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी कारचालकाला अटक केलेली आहे.

Utkarsh Shinde Post
Singer Armaan Malik Disturbed : 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकवर गायक अरमान भडकला, नेमकं काय आहे प्रकरण ?

या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन अपडेट पाहायला मिळत आहे. वरळीच्या 'हिट अँड रन' प्रकरणी 'बिग बॉस मराठी' फेम उत्कर्ष शिंदेने भाष्य केले आहे. त्याने इन्स्टा स्टोरी शेअर करत या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. 'बिग बॉस मराठी ३'मधून प्रसिद्धीझोतात आलेला उत्कर्ष शिंदे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. तो कायमच सोशल मीडियावर सामाजिक विषयांवर तो आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच अभिनेत्याने इन्स्टा स्टोरी शेअर करत वरळीच्या 'हिट अँड रन' प्रकरणावर भाष्य केले आहे.

Utkarsh Shinde Post
Usha Uthup's Husband Jani Chacko Dies : प्रसिद्ध गायिकेच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

"फार फार तर उद्या सिम्बा, सिंघम, सुर्यवंशी सारख्या चित्रपटाची सुरुवात ह्या ॲक्सिडंटने होईल आणि न्याय त्या फिल्ममध्ये फिल्मी न्याय मिळेल. सत्यात न्याय देणारे न्याय मिळू देणार नाहीत. मराठीचा टेंभा मिरवणारे मराठी माणसाला न्याय मिळवून देणार का ? आता होईल ती दुकानदारांची 'सेटलमेंट'" त्या व्हिडिओला अभिनेत्याने अशी कॅप्शन दिलेली आहे.

Utkarsh Shinde News
Utkarsh Shinde PostInstagram

सध्या अभिनेत्याची इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेत्याने या प्रकरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओलाच अभिनेत्याने कॅप्शन दिलेले आहे. उत्कर्ष शिंदेच्या कामाबद्दल बोलायचे तर, लवकरच अभिनेता 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी तो 'बिग बॉस मराठी ३' मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. उत्कर्ष शिंदे अभिनेताही असून गायकही आहे.

Utkarsh Shinde Post
Tejas Thackeray Dance : अनंत- राधिकाच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरे थिरकले; ‘बन्नो की सहेली...’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com