Usha Uthup's Husband Jani Chacko Dies : प्रसिद्ध गायिकेच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Usha Uthup's Husband Jani Chacko Passed Away : भारतातील प्रसिद्ध पॉप सिंगर उषा उथुप यांचे पती जानी चाको यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
Usha Uthup's News
Usha Uthup's Husband Jani Chacko Passed AwaySaam Tv

मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. भारतातील प्रसिद्ध पॉप सिंगर उषा उथुप यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उषा यांचे पती जानी चाको यांचे निधन झाले आहे. जानी चाको यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून त्यांची वयाच्या ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. जानी चाको यांची मुलगी अंजली हिने इंस्टाग्रामवर वडिलांसंदर्भातील एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Usha Uthup's News
Tejas Thackeray Dance : अनंत- राधिकाच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरे थिरकले; ‘बन्नो की सहेली...’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जानी चाको यांची टीव्ही पाहत असताना राहत्या घरीच अचानक तब्येत बिघडली. ते राहायला कोलकात्यात होते. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी चाको यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यानेच झालेले आहे. त्यांच्यावर कोलकात्यामध्ये आज (९ जुलै) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Usha Uthup's News
Anant- Radhika Wedding Muhurta : अनंत-राधिकाच्या लग्नासाठी १२ जुलैच तारीख का निवडली? कारणही आहे तितकंच खास

"आप्पा तुम्ही लवकर निघून गेलात. पण तुम्ही नेहमीच स्टाइलिश आयुष्य जगत होते. तुम्ही जगातील सर्वात सुंदर व्यक्ती होते. मी नेहमीच तुमच्यावर फार प्रेम करते. खरा जेंटलमॅन आणि हृदयाने लॉरेंसियन आणि फाइनेस्ट टी टेस्टर होते तुम्ही." अशी पोस्ट उषा उथुपची मुलगी अंजली उथुप हिने खास इन्स्टाग्रामवर वडिलांसाठी लिहिलेली आहे.

रिपोर्ट्सनुसार, उषा उथुप यांचे जानी चाको हे दुसरी पती होते. उषा यांचा पहिला विवाह रामू यांच्यासोबत झाला होता. पण, लग्नाच्या काही वर्षानंतरच रामू यांचे निधन झाले. उषा आणि जानी चोको यांची भेट ७० च्या दशकात झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. उषा उथुप या भारतातील फेमस गायिका आहेत. त्या एक पॉप सिंगर आहेत. उषा यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायले आहेत.

Usha Uthup's News
Anant- Radhika Mehndi Event : राधिकाचं 'अनंत' प्रेम! हातावर नावासह सजली सुंदर मेहंंदी; कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रेटींचीही गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com