Anant- Radhika Mehndi Event : राधिकाचं 'अनंत' प्रेम! हातावर नावासह सजली सुंदर मेहंंदी; कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रेटींचीही गर्दी

Anant- Radhika Mehndi Updates : भारतातले सर्वात भव्य दिव्य लग्न असणाऱ्या राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या विवाह विधींना सुरुवात झाली आहे. नुकतीच अनंत- राधिका यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला.
Anant- Radhika Wedding Event
Anant- Radhika Mehndi EventSaam Tv

भारतातले सर्वात भव्य दिव्य लग्न असणाऱ्या राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या विवाह विधींना सुरुवात झाली आहे. नुकतीच अनंत- राधिका यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. अंबानींच्या अँटिलिया या घरामध्ये हळदीचा कार्यक्रम पार पडला. घरात पाहुण्यांची रेलचेल सुरु असून संपुर्ण बंगला सुंदर सजवला आहे. यावेळी हळदीच्या कार्यक्रमात अनेक मोठमोठे सेलिब्रेटी उपस्थित होते.

Anant- Radhika Wedding Event
Sangeeta- Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न

यावेळी हळदीच्या कार्यक्रमासाठी, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सारा अली खान, रणवीर सिंह, सलमान खान, जान्हवी कपूर, शिखर पहाडिया, अनन्या पांडे, गायक उडित नारायण, राहुल वैद्य, मानुषी छिल्लर, रकुल प्रीत सिंह, अर्जुन कपूरसह अनेक सेलिब्रिटी हळदीसाठी उपस्थित होते. स्टारकिड्सचा बेस्ट फ्रेंड म्हणून प्रसिद्ध असलेला ऑरी सुद्धा लग्नाला उपस्थित होता. सर्वच सेलिब्रिटींनी हळदी स्पेशल लूक केलेला होता. त्यामुळे सर्वांचीच फॅशन पाहण्यासारखी होती.

या हळदीच्या कार्यक्रमामध्ये, सर्वांचेच लक्ष वेधलं ते, राहुल वैद्य आणि उदित नारायण यांच्या गाण्याने. हळदीच्या कार्यक्रम हा परंपरा, संगीत आणि उत्सव यांचा अप्रतिम संगम ठरला. अंबानी कुटुंब या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी करताना दिसले. मीडिया रिपोर्टनुसार, हळदीचा कार्यक्रम परंपरा आणि संगीताचा मिलाफ होता. राहुल आणि उदितने कार्यक्रमामध्ये, रोमँटिक गाण्यांसह क्लासिकल गाण्यांवर परफॉर्मन्स सादर केला.

Anant- Radhika Wedding Event
Anant- Radhika Wedding News : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात सजणार सुरांची मैफल, बॉलिवूडचे दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स

राधिकाचा काल मेहंदी इव्हेंट पार पडला. या हळदी इव्हेंटमध्ये, अंबानी कुटुंबीयांनीही उपस्थिती लावली होती. त्यासोबतच काही बॉलिवूड सेलिब्रिटींनही उपस्थिती लावली होती. सध्या सर्वांच्याच धम्माल मस्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहंदी समारंभात 'मेहंदी लगा के रखना' आणि 'बोले चुडिया' या गाण्यांवर डान्स केलेल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. राधिका आणि अनंत अंबानी यांचा प्री- वेडिंग सोहळा, संगीत सोहळाच चांगलाच दणक्यात पार पडला होता. येत्या १२ जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये थाटामाटात लग्न पार पडणार आहे.

Anant- Radhika Wedding Event
Siddharth Jadhav : कर्तव्य तत्पर मुंबई पोलिसांचे सिद्धार्थ जाधवने मानले आभार; नेटकऱ्यांकडून सिद्धूवर कौतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com