Sangeeta- Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न
Sangeeta- Salman WeddingSaam Tv

Sangeeta-Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न

Sangeeta Bijlani Birthday: आज सलमान खान ६० वर्षांचा आहे, पण तरीही त्याने लग्न केलेले नाही. एका अभिनेत्रीसोबत सलमानचं नाव जोडलं होतं. इतकच नव्हे तर त्या दोघांच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा होत्या.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेकदा सलमान त्याच्या फिल्मी करियरसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिला आहे. नेहमीच सलमानला त्याचे चाहते "तू लग्न का केले नाही ?" असा प्रश्न विचारतातच. आज सलमान खान ६० वर्षांचा आहे, पण तरीही त्याने लग्न केलेले नाही. अभिनेत्याच्या आयुष्यात आजवर अनेक अभिनेत्री आल्या, अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नावही जोडलं गेलं, पण कोणाशीच लग्न केलं नाही. अशाच एका अभिनेत्रीसोबत सलमानचं नाव जोडलं होतं. इतकच नव्हे तर त्या दोघांच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा होत्या.

Sangeeta- Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न
Anant- Radhika Wedding News : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात सजणार सुरांची मैफल, बॉलिवूडचे दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स

ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संगीता बिजलानी आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक संगीता आहे. ती त्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती. त्याच काळात सलमानसोबतच्या तिच्या अफेअरचे किस्सेही समोर आले होते. त्यावेळी सलमान आणि संगीता फार चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही काही चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले होते. संगीता आणि सलमान खान हे दोघेही लग्न करणार होते. पण त्यानंतर संगीताने अचानक लग्नाला नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान तिच्यासाठी खूप गंभीर होता.

Sangeeta- Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न
Siddharth Jadhav : कर्तव्य तत्पर मुंबई पोलिसांचे सिद्धार्थ जाधवने मानले आभार; नेटकऱ्यांकडून सिद्धूवर कौतुकाचा वर्षाव

सलमान आणि संगीता यांनी एकमेकांना १९८६ पासून डेटिंग सुरू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान- संगीत १९९४ मध्ये, लग्न करणार होते. पण त्याचं लग्न मोडलं. सलमानची मैत्रीण सोमी अलीने एका मुलाखतीमध्ये संगीता आणि सलमानचे नाते तुटण्याचे कारण सांगितले. तिने सांगितलं की, "सलमान आणि संगीताचं लग्न जवळपास ठरलं होतं. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही पाहुण्यांना वाटल्या गेल्या होत्या. बऱ्यापैकी लग्नाची तयारीही झाली होती. पण संगीताला सलमानचे दुसरे अफेअर कळले आणि तिने लग्न मोडलं."

Sangeeta- Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न
Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड

त्यावेळी सलमानचे दुसरं अफेअर सोमी अलीसोबत असल्याचं म्हटलं जात होतं. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी तिने त्या काळातील प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले.मात्र 2010 मध्ये ती त्याच्यापासून वेगळी झाली आणि आजही ती अविवाहित आहे.

संगीताचा आज वाढदिवस आहे. तिने १९८८ मध्ये 'कातिल' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले. संगीताला 'हथियार', 'जुर्म', 'योद्धा', 'इज्जत' आणि 'लक्ष्मण रेखा' सारख्या चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली. तिने हिंदीसह कन्नड चित्रपटातही काम केले आहेत. संगीता बिजलानीने कादर खानच्या कॉमेडी शो 'हंसना मत'मध्ये काही काळ काम केले आणि काही काळ 'किनारे मिलते नहीं' सारख्या मालिकाही केल्या.

Sangeeta- Salman Wedding : तारीख ठरली! पत्रिकाही वाटल्या गेल्या, परंतु या' कारणामुळे मोडलं संगीता- सलमानचं लग्न
Game Changer : "आता अख्खा गेमच बदलणार...", कियारा अडवाणी आणि रामचरणने 'गेम चेंजर'बद्दल चाहत्यांना दिली महत्वाची अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com