Singer Armaan Malik Disturbed : 'बिग बॉस ओटीटी' फेम अरमान मलिकवर गायक अरमान भडकला, नेमकं काय आहे प्रकरण ?

Bigg Boss OTT 3 Armaan Malik : 'बिग बॉस ओटीटी ३' फेम अरमान मलिक सध्या सोशल मीडियावर बराच ट्रोल होत आहे. सर्व प्रकरणामुळे गायक अरमान मलिक चांगलाच संतापला आहे. नेमकं त्यामागील कारण काय? जाणून घेऊया...
Armaan Malik Has Issued Clarification
You Tuber Armaan Malik And Singer Armaan Malik NewsSaam Tv

'बिग बॉस ओटीटी ३' सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो अरमान मलिकमुळे प्रचंड चर्चेत आहे. शनिवारी झालेल्या अरमान मलिक आणि विशाल पांडेमध्ये शनिवारी कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात त्याने विशालच्या थेट कानाखालीच मारली. यामुळे अरमान मलिक कमालीचा ट्रोल होत आहे. पण या सर्व प्रकरणामुळे गायक अरमान मलिक चांगलाच संतापला आहे. नेमकं त्यामागील कारण काय ? जाणून घेऊया...

Armaan Malik Has Issued Clarification
Usha Uthup's Husband Jani Chacko Dies : प्रसिद्ध गायिकेच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

बिग बॉस ओटीटी फेम अरमान मलिक सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याला नेटकरी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करत आहेत. अनेक युजर्स युट्यूबर अरमान मलिकला टॅग करण्याच्या ऐवजी, गायक अरमान मलिकला टॅग केले जात आहे. यामुळे गायक संतापला आहे. गायकाने एक्सवर पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, गायक अरमान मलिकने लिहिले की, "हॅलो, गेल्या अनेक दिवसांपासून एका विषयाकडे दुर्लक्ष करत आहे. पण आता त्या विषयाने हद्द पार केली आहे. त्यावर काही तरी काही ठोस निर्णय घ्यावा लागेल."

"एक युट्यूब कॉंटेंट क्रिएटर ज्याला पूर्वीपासून संदीप नावाने ओळखले जाते. आता त्याने स्वत:चं बदललं आणि बिग बॉस ओटीटीमध्ये आला आहे. मी स्पर्धक अरमान मलिकविषयी बोलतोय. अरमानने नाव बदलल्यामुळे फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होत आहेत. अनेक युजर्स मला चुकून टॅग करत आहेत. आम्ही दोघेही एकच आहोत, असे काही युजर्सचं म्हणणं आहे, त्यामुळे ते मलाच टॅग करीत आहेत. पण मी सिंगर आहे आणि ते युट्यूब कॉटेंट क्रिएटर आहे. हा आमच्यात वेगळेपणा आहे." अशी पोस्ट गायक अरमान मलिकने केली आहे.

Armaan Malik Has Issued Clarification
Tejas Thackeray Dance : अनंत- राधिकाच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरे थिरकले; ‘बन्नो की सहेली...’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

"आम्ही दोघेही पूर्णपणे वेगवेगळे आहोत. माझा बिग बॉससोबत कोणताही संबंध नाही. पण ज्या पद्धतीने ट्रोलर्स मला टॅग करीत आहेत, त्यामुळे माझ्या रेप्युटेशनवर खूप फरक पडत आहे. मी कोणालाही आपले नाव ठेवण्यापासून किंवा बदलण्यापासून रोखू शकत नाही. कृपया त्या अरमान संबंधित असलेल्या पोस्ट्स मला टॅग करणं थांबवा." अशी विनंतीही त्याने नेटकऱ्यांना केलेली आहे. सध्या गायक अरमान मलिकची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.

Armaan Malik Has Issued Clarification
Anant- Radhika Wedding Muhurta : अनंत-राधिकाच्या लग्नासाठी १२ जुलैच तारीख का निवडली? कारणही आहे तितकंच खास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com