Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

Veteran Lavani artist Shakuntala Tai Nagarkar passed away : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज देणाऱ्या शकुंतलाताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.
veteran Marathi Lavani artist Shakuntala Nagarkar death news
veteran Marathi Lavani artist Shakuntala Nagarkar death newssaam tv
Published On
Summary
  • ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

  • गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.

  • १९७४ मध्ये लालबागच्या हनुमान थिएटरमधून त्यांच्या लावणी कारकिर्दीला महत्त्वाची चालना मिळाली

महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या, मात्र या प्रदीर्घ झुंजीत त्यांची प्राणज्योत मालवली. शकुंतलाताई नगरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीय.

शकुंतलाताईंचा जन्म १९६० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई छबूबाई नगरकर याही त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच लावणीचा वारसा लाभलेल्या शकुंतलाताईंनी अवघ्या १२ व्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं. १९७४ मध्ये मुंबईतील गिरणगावातील प्रसिद्ध लालबागच्या 'हनुमान थिएटर'मध्ये त्यांच्या लावणीच्या प्रवासला चालना मिळाली. अनेक दशके त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि अदाकारीने रसिकांच्या मनावर राज्य केले.

veteran Marathi Lavani artist Shakuntala Nagarkar death news
सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप केलंय, विजबीलही येत नाही; गिरीश महाजनांचा दावा

शकुंतलाताईंनी पारंपरिक शैलीवर अवलंबून न राहता कथक गुरू वसंतराव घाटगे यांच्याकडून नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. यामुळे त्यांच्या बैठकीच्या लावणीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. पारंपरिक मंचासोबतच त्यांनी 'लावणी के रंग' आणि 'लव्ह अँड लावणी' सारख्या आधुनिक प्रयोगांद्वारे नव्या पिढीपर्यंत लावणी पोहोचवली. त्यांच्या या मोलाच्या योगदानाची दखल घेत शासनाने व विविध संस्थांनी त्यांना प्रतिष्ठित 'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार', २०१८ मध्ये 'मुंबई महापौर पुरस्कार' आणि २०२३ मध्ये 'नाट्य गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित केले होतं.

veteran Marathi Lavani artist Shakuntala Nagarkar death news
Krishna Mukerji Passes Away: बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्धी अभिनेत्रीला मातृशोक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com