Krishna Mukerji Passes Away: बॉलिवूडवर शोककळा! प्रसिद्धी अभिनेत्रीला मातृशोक

Rani Mukerji Mother Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जी यांच्या आई, कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. यश राज फिल्म्सने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Rani Mukerji’s mother Krishna Mukerji passes away at 75
Rani Mukerji’s mother Krishna Mukerji passes away at 75
Published On
Summary
  • कृष्णा मुखर्जी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय.

  • राणीने आपल्या आईसोबतच्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल अनेकदा मोकळेपणाने भाष्य केलं होतं.

  • कृष्णा मुखर्जी राणी मुखर्जीच्या पाठिशी कायम उभ्या होत्या.

अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा परसलीय. 'यश राज फिल्म्स'ने कुटुंबाच्या वतीने निवेदन जारी करून या वृत्ताला दुजोरा दिलाय. मिळालेले प्रेम, प्रार्थना आणि पाठिंबा यांबद्दल कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या कठीण काळात आपली प्रायव्हसी जपली जावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान कृष्णा मुखर्जी यांचे निधन कशामुळे झाले याचे कारण अद्याप समोर आले नाहीये.

कृष्णा मुखर्जी आणि राणी मुखर्जी यांच्यात नातं अतूट होतं. राणीने आपल्या आईसोबतच्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल अनेकदा मोकळेपणाने भाष्य केलं होतं. अनेक वर्षांपासून, पुरस्कार सोहळे, चित्रपटांचे स्क्रीनिंग आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांना राणीसोबत कृष्णा उपस्थित राहत असल्याचे दिसून आले होते. राणी मुखर्जी आपल्या यशाचे श्रेय आपली आई कृष्णा मुखर्जी यांना देते

Rani Mukerji’s mother Krishna Mukerji passes away at 75
Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

कृष्णा मुखर्जी राणी मुखर्जीच्या पाठीशी एखाद्या डोंगराप्रमाणे उभ्या होता. चित्रपटात पदार्पणापासून ते आजपर्यंत त्या तिच्या पाठिशी उभ्या होत्या. राणी जेव्हा कधी एखाद्या पुरस्कार सोहळ्याला, चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला किंवा सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहते तेव्हा तिची आई अनेकदा तिच्यासोबत असायची. राणीचे वडील चित्रपट निर्माते राम मुखर्जी यांच्या निधनानंतरही, कृष्णा आपल्या मुलीच्या अत्यंत जवळ राहिल्या आणि कुटुंबाला एकसंध ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Rani Mukerji’s mother Krishna Mukerji passes away at 75
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

कृष्णा मुखर्जी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. या कठीण काळात आपल्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती त्यांनी सर्वांना केली असून, मिळालेले प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com