Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Bollywood Actress Hospitalized : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Bollywood Actress Hospitalized
Famous Actress SAAM TV
Published On
Summary

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर

बॉलिवूड अभिनेत्रीची अचानक तब्येत बिघडली

अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल आहे. अभिनेत्रीची अचानक तब्येत बिघडली. सध्या 'लस्ट स्टोरीज ३'मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कोंकणा सेन शर्माला डेंग्यूमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे.

कोंकणा सेन शर्माने रुग्णालयातील बेडरुमचा इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि आता तिला बरे वाटत असल्याचे सांगितले, तसेच लोकांना डेंग्यूबाबत काळजी घेण्याचे आवाहनही केले. तिने लिहिलं की, "मित्रांनो, डेंग्यूपासून सावध राहा. मी रुग्णालयात होते, पण आता बरी आहे..." असे कोंकणाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटोसोबत लिहिले. त्यानंतर, रविवारी तिने 'लस्ट स्टोरीज ३' च्या प्रमोशनदरम्यानचे फोटो पोस्ट केले. एकंदर कोंकणा सेन शर्मा डेंग्यूमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि आता ती रिकव्हर होत आहे.

कोंकणा सेन शर्मा हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच अभिनेत्रीचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते तिला तब्येतीची काळजी घ्याण्याचे सांगत आहेत. तसेच तिच्या 'लस्ट स्टोरीज ३' चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत.

Bollywood Actress Hospitalized
Famous Actress : "पुरुषांनाही मासिक पाळी यावी..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ| VIDEO

कोंकणा सेन शर्मा ही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. कोंकणा अलिकडेच 'सर्च: द नैना मर्डर केस' आणि 'लस्ट स्टोरीज ३' मध्ये दिसली.'वेक अप सिड', 'लाइफ इन मेट्रो', 'तलवार', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हे तिचे चित्रपट खूपच गाजले. तसेच ती 'डॉली किटी और वो चमकते सितारे' मध्येही दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com