Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Actress Hospitalized: दाक्षिणात्य अभिनेत्री आणि डान्सर डिस्को शांती यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाकात ट्यूब दिसल्याने चाहते चिंतेत असून, त्यांनी ‘बॅक टू होम’ म्हटलं आहे.
Actress Hospitalized
Actress HospitalizedSaam Tv
Published On

Actress Hospitalized: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर डिस्को शांती यांच्या एका फोटोने सध्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. ८० आणि ९०च्या दशकात आपल्या दमदार नृत्यामुळे आणि ग्लॅमरस भूमिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या डिस्को शांती यांनी सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या नाकातून एक ट्यूब लावलेली दिसत आहे. मात्र, आपल्या प्रकृतीबाबत त्यांनी कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.

डिस्को शांती यांनी फोटो शेअर करताना केवळ ‘बॅक टू होम’ असे कॅप्शन लिहिले. त्यामुळे त्या हॉस्पिटलमधून घरी परतल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, त्यांना नेमका कोणता त्रास झाला होता, त्यांना हॉस्पिटलमध्ये का दाखल करण्यात आले होते किंवा त्यांच्यावर कोणते उपचार करण्यात आले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Actress Hospitalized
Shehnaaz Gill: 'आज आम्ही थोडक्यात वाचलो...'; विमानातील धक्कादायक अनुभवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

त्यांच्या हॉस्पिटलमधील फोटोमुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सोशल मीडिया पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली असून, लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या डिस्को शांती यांनी घरी परतल्याची माहिती दिली आहे.

Actress Hospitalized
Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

८०-९०च्या दशकात गाजलं नाव

डिस्को शांती या ८० आणि ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर्सपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि ओडिया भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेषतः त्यांच्या डान्स नंबरची त्या काळात मोठी चर्चा होती. १९८३ मध्ये ‘वसंतमे वरुगा’ या तमिळ चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केला होता.

लग्नानंतर घेतला चित्रपटांपासून ब्रेक

अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असतानाच डिस्को शांती यांनी अभिनेता श्रीहरी यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून काहीसं अंतर घेतलं. २०१३ मध्ये श्रीहरी यांचं निधन झाल्यानंतर त्या मनोरंजनविश्वापासून आणखी दूर राहिल्या. दरम्यान, आता जवळपास तीन दशकांनंतर डिस्को शांती पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. ‘पुल्ला’ या प्रोजेक्टमधून त्या पुन्हा पडद्यावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com