Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

Maharashtrachi Hasyajatra Writer Death: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. सचिन गोस्वामींसह कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Maharashtrachi Hasyajatra Writer Death
Maharashtrachi Hasyajatra Writer DeathSaam Tv
Published On

Maharashtrachi Hasyajatra Writer: महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कार्यक्रमाच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट

सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये विजय कुमार राख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत लिहिले, हास्यजत्रेच्या सृजन टीम मधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले. विजय कुमार विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामिण जीवनाचे बारकावे हेरणारे मराठवाड्यातील एक होतकरू लेखक होते .ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्र,हास्यजत्रा टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारा साठी मोठा धक्का आहे. हास्यजत्रा टीम त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेत सहभागी आहे. विजयकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

‘हास्यजत्रा’च्या सृजन टीममध्ये होते कार्यरत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांमुळे लोकप्रिय झालेला नाही, तर त्यामागे लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची मोठी टीम काम करते. विजय कुमार राख हे याच सृजन टीमचा भाग होते. विनोदी लेखनात त्यांचा हातखंडा होता. ग्रामीण जीवनातील प्रसंग, बोलीभाषा आणि दैनंदिन जीवनातील बारकावे विनोदी पद्धतीने मांडण्याची त्यांची शैली होती.

Maharashtrachi Hasyajatra Writer Death
UPI Payment Tax: ४० पैसे भरल्याने तुम्ही मरणार नाही; UPI टॅक्सवर नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

कलाकारांकडून श्रद्धांजली

अभिनेता अंकुर वाढवे यांनीही सोशल मीडियावर विजय कुमार राख यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली. विजय कुमार हे सर्जनशील लेखक, दिग्दर्शक आणि आपले मार्गदर्शक होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या अकाली निधनाने आपण सुन्न झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Maharashtrachi Hasyajatra Writer Death
Shehnaaz Gill: 'आज आम्ही थोडक्यात वाचलो...'; विमानातील धक्कादायक अनुभवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, निखिल बने, ओंकार राऊत यांसह अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या कलाकारांच्या अभिनयामागे लेखक आणि सृजन टीमची मोठी मेहनत असते. विजय कुमार राख यांच्या निधनामुळे या पडद्यामागील सर्जनशील टीममधील एक महत्त्वाचा सदस्य गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com