Famous Actress : "पुरुषांनाही मासिक पाळी यावी..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ| VIDEO

Bollywood Actress Talk On Period Leave : बॉलिवूड अभिनेत्रीने 'पीरियड लीव्ह' भाष्य केले आहे. तसेच पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Bollywood Actress Talk On Period Leave
Famous Actresssaam tv
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेत्रीच्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्रीने पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी व्यक्त केली इच्छा

अभिनेत्रीने मासिक पाळीच्या वेदनांबद्दल मांडली व्यथा

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत श्रुती हासनने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि त्यासंबंधीच्या आरोग्याबाबतच्या अज्ञानाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. पुरुषांनाही मासिक पाळीचा अनुभव घेता यावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. मासिक पाळीतील वेदनांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिले जात नाही, त्यामुळे कामाच्या करारांमध्ये 'पीरियड लीव्ह' समाविष्ट असावी, असे तिला वाटते.

सोहा अली खानच्या पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान, श्रुतीने मासिक पाळीशी संबंधित काही गैरसमज आणि त्या परिस्थितीचा तिने वैयक्तिक पातळीवर कसा सामना केला, यावर चर्चा केली. अभिनेत्री म्हणाली की, "मी हजारो वेळा प्रार्थना केली आहे की, पुरुषांनाही मासिक पाळी यावी. मग आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 'पीरियड हॉलिडेज' समाविष्ट केल्या गेल्या असत्या."

श्रुतीने सांगितल्याप्रमाणे, तिला पीसीओएस (PCOS - पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) चा त्रास असल्याने मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होतात. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलताना श्रुती म्हणाली की, "मी मासिक पाळीबद्दल फारसे बोलायची नाही कारण लोकांना या विषयावर चर्चा करायला आवडणार नाही असे मला वाटायचे...सुरुवात अशीच झाली. जेव्हा मी पहिल्यांदा एका दिग्दर्शकाला याबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीलाही मासिक पाळीत खूप वेदना होतात. या गोष्टीमुळे परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. "

Bollywood Actress Talk On Period Leave
Salman Khan : सलमान खान ट्रोलर्सला एकटा भिडला; बिग बॉसमध्ये शर्टलेस होऊन दिले उत्तर, VIDEO नं सोशल मीडियावर खळबळ

श्रुतीने सांगितल्याप्रमाणे, शारीरिक आरोग्याविषयीच्या संवादांमुळे लोकांना एकमेकांना समजून घेण्यास आणि एकमेकांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते, याची जाणीव तिला झाल्याने मी मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. अभिनेत्री पुढे म्हणाली, "एकदा माझ्या एका सह-कलाकाराने सांगितले की त्याची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे; त्यावर आम्ही 'ठीक आहे, मग आपण त्यानुसार कामाचे नियोजन करूया' असे ठरवले.तेव्हा मीही सांगितले की, मला मासिक पाळी आली आहे..." महिलांच्या मासिक पाळीच्या त्रासाकडे लक्ष का दिलं जात नाही? असा प्रश्न श्रुतीने उपस्थित केला.

श्रुती हासनचे करिअर

श्रुती हासन शेवटची २०२५ मध्ये 'कुली' या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती विजय सेतुपतीसोबत 'ट्रेन' आणि दुलकर सलमानसोबत 'आकासमलो ओका तारा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. चाहते आता श्रुती हासनच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com