Salman Khan : सलमान खान ट्रोलर्सला एकटा भिडला; बिग बॉसमध्ये शर्टलेस होऊन दिले उत्तर, VIDEO नं सोशल मीडियावर खळबळ

Salman Khan Responds To Weight Trolling : सलमान खानने त्याला वजनावरून आणि वयावरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. वीकेंड का वारमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.
Salman Khan Responds To Weight Trolling
Salman KhanSAAM TV
Published On
Summary

सलमान खानला वय-वजनावरून ट्रोल केले गेले

सलमान खान ट्रोल करणाऱ्यांवर भडकला

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानचा रौद्र अवतार

'बिग बॉस २०'चा 'वीकेंड का वार' चांगलाच गाजत आहे. सलमान खानला गेल्या काही काळापासून त्याच्या वयावरून आणि वजनावरून टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्याने या टिप्पण्यांकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले आहे. मात्र 'बिग बॉस २०'च्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. स्काऊट आणि अरिशफा खान यांच्यातील भांडणावर प्रतिक्रिया देताना सलमानने अखेर या विषयावर भाष्य केले.

बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये होस्ट सलमान कॅप्टन्सी टास्कदरम्यान स्काऊट आणि अरिशफा यांच्यात झालेल्या भांडणावर भाष्य करताना दिसत आहे. टास्कदरम्यान अरिशफाला मारल्याचा आरोप झाल्यानंतर आणि गेमिंग कम्युनिटीबद्दल केलेल्या तिच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना, स्काऊट त्याच्या कम्युनिटीशी बोलताना म्हणाला, "इसको खतम करदो". शोमधील त्याच्या कृतीबद्दल स्काऊटला बिग बॉसने फटकारले. 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने विचारले, "आप अपनी गेमिंग कम्युनिटी को शाउटआउट देना चाहोगे मेरे बारे में के, आगर में कुछ गलत बोल दूँ, तो मुझे भी देख ले? इनको ऐसा लगता है के, किसी की मार के मजा आता है..."

सलमान खानने सेलिब्रिटींना ट्रोल करण्यामागील मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला, "काय मानसिकता आहे? माझ्यासोबतही असंच झालं, भाई जाडा झाला आहे, ज्याला ट्रोल करायचे आहे त्यांनी करा...या सर्वांनी बोला..." त्यानंतर सलमान खानने जॅकेट, काउबॉय हॅट फेकून देतो आणि त्याचा टी-शर्ट काढतो.

Salman Khan Responds To Weight Trolling
Salman Khan : छातीत दुखायला लागलं, स्टेजवर कोसळला; सलमानची तब्येत पाहून चाहते चिंतेत, Bigg Boss मध्ये नेमकं काय घडलं?

सलमान खान बोलला, "प्रत्येक शोमध्ये लोक वयाबद्दल बोलत राहतात, मी म्हातारा झाला आहे आणि मी बदललो आहे. तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? तुम्ही कोणाच्या वजनावर, दिसण्यावर, कुटुंबावर, हसण्यावर, अपयशावर किंवा कोणी आई झाल्यावर ट्रोल करता. माझ्यासोबतही तेच झालं... हो मी ६० वर्षांचा झालो आहे..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com