Shruti Vilas Kadam
एंडोमेट्रिओसिस (Endometriosis) चे प्रमुख लक्षण म्हणजे मासिक पाळीदरम्यान नेहमीपेक्षा जास्त किंवा असह्य पोटदुखी होणे. काही महिलांमध्ये ही वेदना दैनंदिन कामांवरही परिणाम करू शकते.
मासिक पाळीदरम्यान नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणे किंवा पाळीच्या आधी-पश्चात रक्तस्राव होणे हेही संभाव्य लक्षण असू शकते.
Endometriosis मुळे लैंगिक संबंधांच्या वेळी किंवा शौच करताना, विशेषतः मासिक पाळीदरम्यान, वेदना जाणवू शकतात.
खालच्या पोटात किंवा कंबरेत सतत वेदना, पोट फुगणे, थकवा किंवा मळमळ यांसारख्या तक्रारी काही महिलांमध्ये दिसू शकतात.
काही महिलांमध्ये Endometriosis मुळे गर्भधारणा होण्यास अडचण येऊ शकते. मात्र, Endometriosis असलेल्या प्रत्येक महिलेला वंध्यत्वाची समस्या असेलच असे नाही.
लक्षणे आणि वैद्यकीय इतिहास समजून घेतल्यानंतर डॉक्टर शारीरिक तपासणी, अल्ट्रासाऊंड किंवा MRI सारख्या चाचण्या सुचवू शकतात. काही परिस्थितींमध्ये लॅप्रोस्कोपीद्वारेही तपासणी केली जाते.
उपचार लक्षणांची तीव्रता, वय आणि गर्भधारणेची इच्छा यानुसार ठरवले जातात. वेदनाशामक औषधे, हार्मोनल उपचार किंवा काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेचा पर्याय डॉक्टर सुचवू शकतात.
(टीप: तीव्र मासिक पाळीच्या वेदना किंवा वारंवार होणाऱ्या इतर तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य निदानासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)