Veen Doghantali Hi Tutena : प्रेमासाठी कायपण! करोडपती राडवाडे भर पावसात टपरीवर पितात चहा; स्वानंदीचा हातातहात घेऊन रोमँटिक डेट | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. पावसाळ्यात समर-स्वानंदी रोमँटिक डेटवर जातात. खास व्हिडीओ पाहा.
Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Veen Doghantali Hi TutenaSAAM TV
Published On
Summary

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत प्रेमाचे वारे

समर-स्वानंदीची चहाच्या टपरीवर रोमँटिक डेट

करोडपती राडवाडे टपरीवर चहा पितात

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत वटपौर्णिमेला स्वानंदी समरला आपल्या मनातील भावना सांगते. दोघे एकमेकांना आय लव्ह यू बोलून आपल्या नवीन नात्याला सुरुवात करतात. मात्र त्याच्या प्रेमाला मल्लिका नावाचे ग्रहण लागते. स्वानंदी समरमधील रोमँटिक क्षण मल्लिका कटकारस्थान करून बिघडवून टाकते. तर अंशुमन स्वानंदीला धमकी देतो की, सहा महिन्यात तुमचे नाते तोडणार. अशात आता मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे. जो पाहून प्रेक्षकांना खूपच आनंद होईल.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

प्रोमो व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, समर आणि स्वानंदी गाडीने पावसात प्रवास करत असतात. तेव्हा समर म्हणतो की, "स्वानंदी मॅडम आपण चहा घेऊयात का, मस्त हॉटेलमध्ये, एखाद्या ५ स्टार हॉटेलमध्ये..." तेव्हा स्वानंदी म्हणते की, "चहा कोण ५ स्टार हॉटेलमध्ये जाऊन पित ओ राजवाडे..." त्यानंतर दोघेही एका चहाच्या टपरीवर येतात. समर स्वानंदीचा हातात हात पकडून चालतो. दोघे रिमझिम पावसात दोन कटिंग चहाचा आनंद घेतात. समर चहाचा पहिला घोट घेतो तेव्हा स्वानंदी विचारते की, "मजा आली ना?" तेव्हा समर बोलतो की, "आजपर्यंत मी असे कधीच केले नाही. पण तुमच्यामुळे हे सर्व करायला लागलो आहे मी..." त्यानंतर दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहतात.

प्रोमो व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "प्रेमात पडलेले राजवाडे, स्वानंदीसाठी टपरीवर चहा घेणार...!" या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत एकीकडे समर-स्वानंदीचे प्रेमाचे नाते फुलताना दिसत आहे, तर दुसरीकडे मल्लिका आणि अंशुमन दोघांच्या नात्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये समर-स्वानंदीचे नाते नेमकं कोणते वळण घेणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

वटपौर्णिमा स्पेशल

वटपौर्णिमा स्पेशल समर-स्वानंदीचे 'सात जन्मभर साथ जन्मभर ' हे गाणे रिलीज झाले, ज्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. गाण्यात दोघेही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाले. मैत्रीच्या नात्याने जुळलेली ही वीण आता प्रेमाच्या सुंदर नात्यात फुलताना दिसत आहे. प्रेक्षक सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या जोडीचे भरभरून कौतुक करत आहेत.

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com