Web Series : 'मलेरिया दादूस' पुन्हा येतोय; वेब सीरिजमधून करणार कमबॅक, कुठे पाहाल?

Jayesh Chavan New Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला 'इपितर' फेम 'आर्थिंग्या' येतोय. अभिनेता जयेश चव्हाणने मोठी अपडेट दिली.
Jayesh Chavan New Web Series
Web Seriessaam tv
Published On

मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष घर केलेल्या 'इपितर' या चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय आणि लाडके पात्र 'आर्थिंग्या' आता नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात आर्थिंग्याची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते जयेश चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

'इपितर' चित्रपटातील आर्थिंग्या या पात्राला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. त्याची निरागसता, संवाद आणि आगळीवेगळी विनोदशैली आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. आता हेच बहुचर्चित पात्र एका नव्या रंजक कथानकासह आणि नव्या स्वरूपात वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे मुख्य पात्र साकारणारे अभिनेते जयेश चव्हाण हे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील रहिवासी असल्याने या निमित्ताने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

'आर्थिंग्या' या नव्या आगामी वेबसीरिजची निर्मिती गोल्डन एरा स्टुडिओज करत आहे. या भव्य प्रकल्पासाठी सध्या ऑनलाईन ऑडिशनलाही सुरुवात करण्यात आली आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून नवोदित तसेच अनुभवी स्थानिक कलाकारांना अभिनयाची मोठी संधी उपलब्ध करून दिली जात असून, इच्छुक कलाकारांकडून ऑडिशन मागविण्यात येत आहेत.

नव्या प्रोजेक्ट बद्दल अभिनेते जयेश चव्हाण म्हणाले की, "आर्थिंग्या हे माझ्यासाठी केवळ एक पात्र नसून, प्रेक्षकांनी मला दिलेल्या अथांग प्रेमाची एक ओळख आहे. पुन्हा एकदा हेच पात्र नव्या रूपात साकारण्याची आणि प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी मिळत असल्याचा मला मनापासून अत्यंत आनंद होत आहे..." 'आर्थिंग्या' वेबसीरिजचे दिग्दर्शन, इतर कलाकार आणि प्रदर्शनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Jayesh Chavan New Web Series
Death News : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अन् अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com