Tharala Tar Mag : सायलीची कोर्टातच होणार डिलिव्हरी, लवकरच 'ठरलं तर मग'मध्ये नव्या पाहुण्याचं आगमन|VIDEO

Tharala Tar Mag New Promo Video : 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कोर्टाच्या अंतिम निकालानंतर सायलीची कोर्टातच डिलिव्हरी होणार आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोने लक्ष वेधले आहे.
Tharala Tar Mag New Promo Video
Tharala Tar Mag SAAM TV
Published On: 
Summary

मुलींचा तस्करीच्या केसचा निकाल अखेर लागणार

सायलीला कोर्टातच प्रसुतीकळा सुरू

सायलीची कोर्टातच होणार डिलिव्हरी

'ठरलं तर मग' मालिका गेले काही महिन्यांपासून खूपच मनोरंजक वळणावर पाहायला मिळत आहे. आश्रमातील मुलींची तस्करी केल्याप्रकरणी भर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला पोलीस अटक करतात. अर्जुन सायलीची केस हातात घेतो. यात मात्र अर्जुनवर दोन वेळा जीवघेणा हल्ला होतो. तेव्हा गरोदर सायलीच स्वतःची केस लढण्याचा निर्णय घेते आणि पुरावे शोधायला लागते.

'ठरलं तर मग'मध्ये मुलींच्या तस्करीचे खरं सत्य शोधून काढण्यासाठी सायली-अर्जुन मंजुळा आणि शांतारामच्या वेशात दिसतात. श्रीमंत अर्जुन सुभेदार एका गरीब म्हाताऱ्याच्या रुपात दिसत आहे. तर सायली गरोदर अवस्थेत डोक्यावर भांड्यांनी भरलेले टोपले घेऊन फिरताना दिसत आहे. अखेर आता या केसचा निकाल लागणार आहे. मात्र त्यातही मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचा धक्कादायक प्रोमो समोर आली आहे.

मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये न्यायाधीश केसचा निकाल सांगताना दिसत आहे. कोर्टात सायलीची निर्दोष मुक्तता होते. मात्र तेवढ्यात सायलीच्या पोटात प्रसुतीकळा सुरू होतात. आनंदाचे वातावरण अचानक भीतीमध्ये बदलतो. अर्जुन सायलीजवळ धावतो. सायलीची डिलिव्हरी कोर्टातच होताना दिसते. कारण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ही वेळ नसतो. कोर्टातील महिला डिलिव्हरीसाठी मदत करताना दिसत आहेत. अर्जुन मात्र खूपच घाबरतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोर्टात न्यायाधीश बोलतात की, "मुलींचा तस्करीच्या केसमधून सायली सुभेदार यांची निर्दोष सुटका करण्यात येत आहे..." हे ऐकताच सायली, अर्जुन दोघांनाही खूप आनंद होतो. मात्र तेवढ्यात सायलीला कळा सुरू होतात. तिच्या डिलिव्हरीची वेळ आलेली असते. सायली कोर्टातच कोसळते. आता कोर्टातच सायलीची डिलिव्हरी होणार आहे. ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे. या प्रोमोने चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता वाढली आहे.

Tharala Tar Mag New Promo Video
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवरील गोळीबारामागचा नेमका हेतू काय? आरोपींचा धक्कादायक दावा

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, "निर्दोष सुटकेनंतर सायलीची कोर्टातच होणार डिलिव्हरी..." या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहे. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचे दिसत आहे. 'ठरलं तर मग' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री 8:30 वाजता पाहायला मिळते. मालिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com