'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुनवर होतो जीवघेणा हल्ला
सुभेदारांच्या कुटुंबावर संकटांचे सावट
गरोदर सायली आणि अर्जुनचे सिक्रेट मिशन सुरू
सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत रोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. डोहाळे जेवणापासून अर्जुन-सायलीच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे येताना दिसत आहे. प्रियाच्या कट कारस्थानामुळे सायलीला जेल होते. आश्रमातील मुलींची तस्करी केल्याप्रकरणी भर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमा दिवशी पोलीस सायलीला अटक करतात. अर्जुन केसचा तपास घेतो आणि सायलीला जेल मधून बाहेर काढतो, मात्र आता गोष्टीत मोठी ट्विस्ट आला आहे.
अर्जुन केस संबंधित पुरावे शोधत असताना त्यांच्यावर गुंड जीवघेणा हल्ला करतात. मात्र यात अर्जुन थोडक्यात वाचतो. तो हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. अर्जुनच्या चाकू हल्ल्याची माहिती मिळताच सुभेदार कुटुंबाला धक्काच बसतो. मालिकेच्या नवीन प्रोमोने तर प्रेक्षकांना वेड लावले आहे. तुम्ही पाहू शकता की, अर्जुन हॉस्पिटलमधून सायलीला केससाठी मदत करतो. आता गरोदर सायली लेडी सिंघमच्या रुपात दिसणार आहे.
आता सायलीच स्वतःची केस लढणार आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडून पुरावे शोधताना दिसत आहे. या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागताना दिसत आहे. पण सायली हार न मानता आपल्या बाळासाठी आणि अर्जुनसाठी केस लढताना दिसणार आहे. अर्जुन हॉस्पिटलमध्ये राहून फोनवर सायलीला मार्गदर्शन करणार आहे. सायली केसच्या फाइल्स घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहे. ती कोर्टात सगळे पुरावे घेऊन जाते आणि म्हणते की, "माझी केस मीच लढणार..."
'ठरलं तर मग' च्या प्रोमो व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अर्जुनच्या साथीने सायली स्वतः लढणार तिची केस..." 'ठरलं तर मग' चे येणार भाग खूपच रोमांचक असणार आहे. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दररोज रात्री ८.३० वाजता पाहायला मिळते. 'ठरलं तर मग'च्या या प्रोमोवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आता येणारे भागांमध्ये सायली कसा सत्याचा शोध घेणार पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.