Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition In Mumbai : मुंबईत चित्रकार शैलेश मेश्राम यांच्या 'प्लेसेस अँड फेसेस' या विशेष जलरंग चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकाण आणि प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या.
Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition In Mumbai
Tharala Tar Mag! SAAM TV
Published On
Summary

अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या आरोपाखाली सायलीला अटक

सायली विरोधात कोर्टात पुरावे सादर

सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुनचा मोठा प्लान

'ठरलं तर मग!' मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात पोलीस सायलीला अटक करतात, ज्यामुळे सुभेदार कुटुंबावर मोठे संकट येते. सायलीला अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या आरोपाखाली पोलीस अटक करतात. प्रियाच्या कट कारस्थानात सायली अडकते. आता अर्जुन सायलीला जेल बाहेर कसं काढणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सायलीला गरोदर अवस्थेत प्रिया जेलमध्ये छळताना दिसत आहे. मात्र सायली ठामपणे आलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे. तिला विश्वास आहे की, अर्जुन तिला यातून बाहेर काढेल. सायली प्रियाला ठामपणे सांगते की, मी माझ्या मुलाला जेलबाहेरच जन्म देईन. दुसरीकडे अर्जुनही सर्व केसचा पाठपुरावा करायला सुरुवात करतो. अशात आता 'ठरलं तर मग!' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

प्रोमोमध्ये नेमकं काय?

न्यायाधीश अर्जुनला वकिल पत्र सादर करायला सांगतात तेव्हा अर्जुन बोलतो की, "सायली सुभेदार यांच्यावर आरोप आहे की त्यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली. व्हिडीओज बनवून पैसे कमावले. आणि माझे वकिल मित्र ॲड. शेंडे यांनी आधीच हे प्रूफ केले आहे की, हे सगळे आरोप खरे आहे. सायली सुभेदार यांच्यावर लागलेले सर्व घाणेरडे आरोप पुराव्यासकट सिद्ध झाले आहेत. " अर्जुनचे हे रुप पाहून सायली आणि सुभेदार कुटुंबाला मोठा धक्का बसतो. सायली तर ढसाढसा रडायला लागते. तेव्हा ॲड. शेंडे म्हणतात की, "व्हा! ॲड सुभेदार तुम्ही तर हार मानली." तेव्हा गोष्टीत मोठा ट्विस्ट येतो. अर्जुन पुन्हा बोलतो की, "हरणार तर तुम्ही आहात अॅड. शेंडे...कारण तुम्ही सादर केलेले सर्व पुरावे खोटे आहेत..." हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर हास्य येते.

Shailesh Meshram 'Places and Faces' Art Exhibition In Mumbai
Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, "अर्जुन कसं निर्दोष सिद्ध करणार सायलीला...?" या प्रोमोवर प्रेक्षक भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. मालिकेत पुढे काय घडणार, प्रियाचे कारस्थान कसं समोर येणार, सायली सुटणार की अधिकच अडकणार हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ठरलं तर मग' चा भाग शुक्रवार १४ ऑगस्ट रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com