Tharala Tar Mag! : प्रियाचा डाव फसणार; सायलीची तुरुंगातून सुटका होणार, 'ठरलं तर मग!' मध्ये येणार 'हा' मोठा ट्विस्ट|VIDEO

Tharala Tar Mag Marathi Serial Update : 'ठरलं तर मग!'मध्ये सायली जेलमध्ये जाते, त्यामुळे मालिकेला धक्कादायक वळण येते. आता जेलमध्ये प्रिया सायलीला त्रास देताना दिसणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार, जाणून घेऊयात.
Tharala Tar Mag Marathi Serial Update
Tharala Tar Mag!SAAM TV
Published On
Summary

डोहाळे जेवणाच्या दिवशी सायली जेलमध्ये जाते

प्रिया जेलमध्ये सायलीसाठी अडचणी निर्माण करते

अर्जुन सायलीला लवकरच जेल बाहेर काढणार

'ठरलं तर मग!' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे. ऐन डोहाळे जेवणाच्या वेळी पोलीस येतात आणि सायलीला अटक करतात. ज्यामुळे अर्जुन आणि सुभेदार कुटुंबाला मोठा धक्का बसतो. प्रिया जेलमधून सायली विरोधात कट कारस्थान रचते आणि तिच्यावर अनाथ आश्रमातील मुलींची तस्करी केल्याचा गंभीर आरोप लावण्यात येतो. आता पोलीस सायलीला जेलमध्ये घेऊन जातात. अशात मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

'ठरलं तर मग!' च्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सायली सर्व महिला कैद्यांच्या सोबत जेवण करत असते. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते की, "बिचारी सायली ताई, सॉरी आदर्श सायली ताई...आता तू इथेच सडणार आणि तुझं बाळही..." तेव्हा सायली प्रियावर चांगलीच भडकते आणि म्हणते की, "प्रिया...माझ्या बाळावर जायचे नाही हा...मी वचन देते माझ्या बाळाला त्याचा जन्म होईल तो जेल बाहेरच..."

'ठरलं तर मग!' च्या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सायली तिच्या बाळाला देणार तुरुंगाबाहेर जन्म देण्याचं वचन..." 'ठरलं तर मग!' मालिका दररोज रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळते. मालिकेत आता अर्जुन सत्याचा शोध कसा घेणार आणि सायलीची जेलमधून सुटका कशी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tharala Tar Mag Marathi Serial Update
Veen Doghantali Hi Tutena : मल्लिकाचं नवं कट कारस्थान; समर-स्वानंदीमध्ये गैरसमजाची ठिणगी, नात्यात येणार दुरावा? VIDEO

'ठरलं तर मग!' ही मालिका प्रेक्षकांची खूपच आवडती आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली मुख्य भूमिकेत दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. गेले ४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com